सामाजिक

लोणी (धामणी) येथे बाजार संपन्न झाले गाळ्यांचे बांधकामाचे भूमीपूजन !!

1009871897
1009871897

पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील लोणी (धामणी) येथील बाजारपेठेमध्ये असलेले जुने गाळे पाडून नवीन गाळ्याच्या बांधकामाचे भूमिपूजन पोलीस पाटील संदीप आढाव यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

५० लाख रुपये बांधकाम खर्च असलेले ग्रामनिधीतून होणारे काम दहा बाय वीस मापाच्या गाळ्यांचे असेल. ह्या गाळ्यांच्या माध्यमातून ग्रामीण तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून गावामध्ये व्यवसाय वाढावा या उद्देशाने हे बांधकाम करण्यात येत आहे असे लोकनियुक्त सरपंच डॉ.सावळाराम नाईक यांनी सांगितले.

यावेळी उपसरपंच राजेंद्र वाळुंज,पोलीस पाटील संदीप आढाव, समाजभूषण कैलासराव गायकवाड, उद्योजक अनिकेत नाईक, सामाजिक कार्यकर्ते माऊली क्षीरसागर, बाळासाहेब सुतार, सूर्यकांत नाना दहिवाळ, आर्किटेक्ट सनी वाळुंज, नितीन दिवटे, ईश्वर दहिवाळ, कपिल क्षीरसागर, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप कोचर,मंगल ताई गायकवाड, पुष्पाताई रोकडे, करिष्मा सोनवणे, व ग्रामस्थ हजर होते.

1009828026
1009850407

Related posts

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवळे येथे बालचमूचा दिंडी सोहळा उत्साहात संपन्न !!

Chief Editor

जारकरवाडी (ता.आंबेगाव) येथील शेतकऱ्याचा मुलगा बनला कृषी अधिकारी !!

Chief Editor

अवकाळीने हिरावला बळीराजाच्या तोंडचा घास;लाखणगावात तीन एकर कलिंगडाची बाग उध्वस्त !!

Chief Editor

Leave a Comment