सामाजिक

ब्रेम्बो इंडिया आणि समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स यांच्यात सामंजस्य करार (MoU) संपन्न !!

1010434525


पंचनामा प्रतिनिधी – उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील दुवा अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने ब्रेम्बो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, बेल्हे यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. MaTPO (Maharashtra Association of Training and Placement Officers) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “ब्रेम्बो अकॅडेमिया मीट – २०२६” या कार्यक्रमात हॉटेल कलासागर, कासारवाडी (पुणे) येथे हा करार संपन्न झाला.
ब्रेम्बो इंडियाच्या वतीने व्यवस्थापकीय संचालक श्री. लुका बोटाझी (Mr. Luca Bottazzi) आणि समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या वतीने प्रशिक्षण व नियुक्ती अधिकारी प्रा. एस. एस. पोखरकर यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
या करारामुळे विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील इंटर्नशिप, उद्योग–संस्था परस्परसंवाद, कौशल्य विकास उपक्रम, तांत्रिक ज्ञानाची देवाणघेवाण तसेच रोजगारक्षमतेत वाढ करणाऱ्या विविध संधी उपलब्ध होणार आहेत. कार्यक्रमादरम्यान ब्रेम्बोच्या जागतिक कार्यपद्धती, आधुनिक औद्योगिक प्रवाह, करिअरच्या संधी आणि उद्योगातील नव्या तंत्रज्ञानाविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपस्थित प्रतिनिधींनी चाकण येथील ब्रेम्बो इंडियाच्या अत्याधुनिक उत्पादन प्रकल्पालाही भेट दिली.
समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, बेल्हे (बांगरवाडी), ता. जुन्नर ही अभियांत्रिकी व तांत्रिक शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबत उद्योगाभिमुख प्रशिक्षण देण्यावर संस्थेचा विशेष भर आहे. उद्योग क्षेत्राशी सातत्याने भागीदारी निर्माण करून विद्यार्थ्यांच्या रोजगारक्षमतेत वाढ करण्यासाठी संस्था प्रयत्नशील असून, हा सामंजस्य करार त्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
ब्रेम्बो ही इटलीस्थित Brembo S.p.A. या जागतिक दर्जाच्या ब्रेकिंग सिस्टीम उत्पादक कंपनीची उपकंपनी आहे. सन २००५ मध्ये चाकण (पुणे) येथे स्थापन झालेला कंपनीचा प्रकल्प कॅलिपर आणि मास्टर सिलिंडर निर्मितीसाठी प्रसिद्ध असून भारतीय दुचाकी उद्योगात कंपनीचा ५० टक्क्यांहून अधिक बाजारहिस्सा आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा. राजीव सावंत, प्राचार्य डॉ. नवनाथ नरवडे तसेच प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर यांनी प्रशिक्षण व नियुक्ती अधिकारी प्रा. एस. एस. पोखरकर यांचे अभिनंदन करून या करारामुळे विद्यार्थ्यांसाठी नवीन संधी उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त केला.

1010391286

Related posts

जल संवर्धनाच्या दिशेने संत निरंकारी मिशनचे जुन्नर-आंबेगाव तालुक्यातील नारायणगाव, जुन्नर सह बोरी-आळेफाटा, घोडेगाव, चास-कडेवाडी आणि चिंचोली (कोकणे) येथे भव्य स्वच्छता अभियान संपन्न…!!

Chief Editor

लोणी (धामणी) ग्रामसभेत अवैध खाणपट्टा व क्रशरविरोधात एकमत ठराव !!

Chief Editor

लोणी (धामणी) येथे नागपंचमी निमित्त भव्य कलगीतुरा सामना उत्साहात संपन्न ; महाराष्ट्रातील प्रसिद्ध कलावंतांच्या सवाल-जवाबांनी रंगला कलगीतुरा; हजारो रसिकांची उपस्थिती !!

Chief Editor

Leave a Comment