सामाजिक

डोक्यावर मदतीचे ओझे, मनात सेवाभाव ; दीड तासांची पायपीट करून साधकांनी ४० आदिवासी कुटुंबांची दिवाळी केली गोड ; किराणा, साड्या व जीवनावश्यक साहित्याचे वाटप !!

1011591095

पंचनामा प्रतिनिधी – परमपूज्य संत आसाराम बापूजी यांच्या सत्प्रेरणेने तसेच साधक बंधू-भगिनींच्या योगदानातून अतिदुर्गम खेते पठार येथे आदिवासी बांधवांसाठी अजित सोनवणे सर यांच्या पुढाकाराने दिवाळी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून परिसरातील ४० कुटुंबांना दिवाळीनिमित्त किराणा साहित्य, साड्या आणि दैनंदिन वापरासाठी आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

1011591938
1011591934

खेते पठार हा परिसर अतिशय दुर्गम असून येथे मूलभूत सोयी-सुविधांचाही अभाव आहे. अशा परिस्थितीत येथील आदिवासी कुटुंबांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, या उद्देशाने साधकांनी सेवाभावी वृत्तीने पुढाकार घेतला.

1011591903
1011591858

या सेवाकार्यासाठी साधकांना तब्बल दीड तासाची पायपीट करावी लागली. वाहनांची सुविधा नसल्याने किराणा साहित्य, साड्या व इतर उपयोगी वस्तू डोक्यावर वाहून नेत साधकांनी डोंगरवाटेने खेते पठार गाठले. प्रतिकूल परिस्थिती आणि पायवाटेचा कठीण प्रवास यांची पर्वा न करता साधकांनी हा सेवायज्ञ पूर्ण केला.

या उपक्रमात श्री. जरे गुरुजी, निलेश मिडगे सर, मनकर सर, सोनवणे सर, शिवाजी टाव्हरे, हारकू लबडे, काळुराम टाव्हरे, विकास केदारी आणि कृष्णा सोनवणे यांनी सहभाग घेतला. भाऊ केदारी यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात संपन्न झाला

1011591838

या सेवाकार्याला स्थानिक ग्रामस्थ, महिला आणि तरुणांचे मोलाचे सहकार्य लाभले. साधकांच्या या उपक्रमामुळे ४० आदिवासी कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. दिवाळीच्या सणानिमित्त गरजू कुटुंबांपर्यंत मदतीचा हात पोहोचवत साधकांनी सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचे दर्शन घडविले.

सेवा, समर्पण आणि माणुसकीचा हा अनोखा दीपोत्सव खेते पठारावरील आदिवासी बांधवांसाठी आनंदाची नवी ज्योत ठरला.

92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 402642

Related posts

शिरदाळे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या पाटोदा गावाला भेट !!

Chief Editor

ग्रापलिंगच्या विकासासाठी नाशिकमध्ये विशेष प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न

Chief Editor

समर्थ अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिक्षक-प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न !!

Chief Editor

Leave a Comment