
प्रतिनिधी – समीर गोरडे
पुणे जिल्ह्यातील केंद्रप्रमुखांचे सप्टेंबर महिन्यापासून रखडलेले वेतन, त्यामुळे निर्माण झालेल्या समस्या तसेच ऑनलाइन माहिती आणि कामांच्या व्यापामुळे केंद्रातील शाळांमध्ये अध्ययन-अध्यापनात येणाऱ्या अडचणींवर मार्गदर्शनासाठी अपुरा वेळ मिळत असल्याबाबत जिल्हा परिषद पुणेचे शिक्षण सभापती तथा उपाध्यक्ष मा. विवेक दादा वळसे पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेचे राज्याध्यक्ष अनिल पलांडे व आंबेगाव तालुका केंद्रप्रमुख अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य उच्चशिक्षित एम.ए. कृती समितीचे राज्याध्यक्ष राजू जाधव यांनी शिष्टमंडळासह प्रश्न मांडले.
याबाबत जिल्हा परिषद सकारात्मक असून लवकरच हे सर्व प्रश्न मार्गी लावले जातील, असे आश्वासन उपाध्यक्ष विवेक दादा वळसे पाटील यांनी दिले.
यावेळी मुळशी तालुक्यातील विस्तार अधिकारी सचिन लोखंडे सर* उपस्थित होते.



