सामाजिक

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात दुष्काळ जाणवायला लागला!!

img 20260212 wa0523

पंचनामा लोणी (धामणी) प्रतिनिधी – लोणी-धामणी परिसरातील मांदळेवाडी, वडगावपीर,पहाडदरा गावांमध्ये व वाडया वस्त्यांमध्ये आतापासून पाणी कमी पडू लागल्याने सध्या शेतात असणारी पिके सुकून जाण्याची भिती या भागातील शेतकर्यांनी व्यक्त केली आहे. चालू वर्षी या भागामध्ये मे महिन्या पासूनच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने या परिसरातील ओढे,नाले पाण्याने भरभरून वाहात होते.साधारण जानेवारी महिन्याच्या अखेर पर्यंत अनेक ठिकाणी ओढ्यांना पाणी होते.मात्र नाल्यांचे पाणी आटले होते.आता मात्र फेब्रुवारी महिन्याच्या दुसर्या आठवड्यात या परिसरातील ओढ्यांचे पाणी आटू लागल्याने ओढे पाण्यावाचून कोरडे दिसू लागले आहेत.

ओढ्यांचे पाणी जसजसे कमी होऊ लागले तस तसे परिसरातील,विंधन विहीरी व विहरींची पाणी पातळी कमी होऊ लागल्याने सध्या शेतात असणार्या पिकांना पाणी कमी पडून पिके सुकून व झळून जाणार अशी भीती या परिसरातील शेतकर्यांनी व्यक्त केली आहे.

img 20260212 wa0522

आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातील हा भाग दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो.दरवर्षी गेली कित्येक वर्षे या गावांना व परिसरातील वाड्या वस्त्यांना दरवर्षी सततची पाणीटंचाई आणि दुष्काळाचा दाहक झळा सोसाव्या लागत आहे.पिण्यासाठी व शेतीसाठी हक्काचे पाणी मिळावे या मागणीकडे शासनाने व राजकीय सर्वपक्षीय नेते मंडळीनी लक्ष द्यावे अशीही मागणी अनेक वर्सांपासून या भागातील ग्रामस्थांकडून होत आहे. पण सर्वे झाला, पहाणी केली या व्यतिरिक्त वरिष्ठ पातळीवरून दुसरे काहीच एकू येत नाही. पिण्याच्या पाण्याची समस्या कशीही सोडवता येते.पण शेतीच्या पाण्याचे काय असा प्रश्न या परिसरातील शेतकरी विचारत आहे.

लोणी,धामणी,पहाडधरा,वडगावपीर, मांदळेवाडी या परिसरातील शेतकरी शेतीच्या पाणी टंचाईमुळे साधारण मार्च,एप्रिल,मे या तीन महिन्यात शेतात काहीच पिके घेत नाही.साधारण आता कसे तरी काही ठिकाणी फेब्रूवारी अखेर पर्यंत शेतीसाठी पाणी पुरेल असा अंदाज शेतकर्यांनी व्यक्त केला आहे.

आतापर्यंत जणावरांना शेतातील हिरवा चारा मिळत आहे.पण पुढील तीन महिने मात्र या परिसरातील शेतकर्यांना दहा ते वीस किलोमीटर दूर जाऊ जनावरांना हिरावा चारा आणावा लगतो.पिण्याच्या पाण्याचे जाऊद्या पण या भागाला शेतीसाठी पाणी मिळणार का ? याचे उत्तर सध्या तरी नकारार्थी दिसत आहे

Related posts

पालखी मार्गाच्या स्वच्छतेसाठी महापालिकेची व्यापक मोहीम;अवघ्या दोन तासांत संपूर्ण पालखी मार्ग केला स्वच्छ !!

Chief Editor

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ;पुणे जिल्ह्यातील मावळ व खेड परिसरात ‘शुभ आरंभ’ उपक्रमातून उल्लेखनीय परिवर्तन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Chief Editor

जारकरवाडी गावच्या शिरपेचात मनाचा तुरा; जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे तीन विद्यार्थी इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र !!

Chief Editor

Leave a Comment