सामाजिक

अजमेळा दिंडीचे कार्य कौतुकास्पद:- सौ.तृप्ती ताई राजेंद्र खरे यांचे प्रतिपादन !!

img 20260227 wa0499

पंचनामा लोणी (धामणी) प्रतिनिधी – माऊलींच्या पायी वारी सोहळ्यातील व आंबेगाव तालुक्यातील आदर्श गाव गावडेवाडी येथील अजामेळा दिंडी क्रमांक २६ चे कार्य अतिशय कौतुकास्पद असून या दिंडीची व संयोजकांची प्रेरणा इतरांनी घ्यावी असेच त्यांचे काम आहे असे प्रतिपादन मोहोळ तालुक्याचे विद्यमान आमदार श्री राजेंद्र खरे यांच्या पत्नी सौ.तृप्तीताई राजेंद्र खरे यांनी पंढरपूर येथे केले.

img 20260227 wa0491

माऊलीच्या पायी वारी सोहळ्यातील अजामेळा दिंडी क्रमांक २६ च्या वतीने पंढरपूर येथील अष्टकोटी ब्रम्हांडनायक पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरात गुरुवार (ता.१९) फेब्रुवारी ते गुरुवार ( ता .२६ )फेब्रुवारी असा सात दिवस अखंड हरिनाम सप्ताह संपन्न झाला.या सप्ताहाला मोहोळ तालुक्याचे (जि.सोलापूर ) विद्यमान आमदार श्री.राजेंद्र खरे यांच्या पत्नी सौ.तृप्तीताई राजेंद्र खरे यांनी आपल्या सहकारी महिला व सहकाऱ्यांसह भेट दिली.यावेळी वारकऱ्यांना व सप्ताहाला शुभेच्छा देताना तृप्तीताई राजेंद्र खरे बोलत होत्या.

यावेळी सप्ताहाचे संयोजक ह.भ.प.पत्रकार श्री.मधुकर महाराज गायकवाड सौ.सविताताई मधुकर महाराज गायकवाड दिंडीचे चोपदार ह.भ.प.मधुकर महाराज साळवे, मुरलीधर महाराज शिंदे,ह.भ.प. अर्जुन महाराज पंचरास ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे व्यासपीठ चालक नेवासे गणेशवाडी (ता.नेवासा ) येथील ह.भ.प श्रीकांत महाराज बेल्हेकर अजमेळा दिंडी क्रमांक २६ चे उपाध्यक्ष बबनराव राजगुरू, ह.भ.प.भाऊसाहेब लोंढे,ह.भ.प.रामा लोंढे,कौसाबाई नागू टाव्हरे,वंदनाताई चव्हाण.सौ.संजीवनीताई
मंडलिक /गायकवाड,लक्ष्मी वहिनी मुरलीधर शिंदे,ह.भ.प सुशीला टेमकर आदी वारकरी व भावीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

fb img 1771121534243

यावेळी पुढे बोलताना तृप्ती ताई खरे म्हणाल्या,महाराष्ट्रात गावोगावी अखंड हरिनाम सप्ताह होतात हे सप्ताह सर्व गाव मिळून करत असतात.मात्र आजामेळा दिंडी आंबेगाव तालुक्यातून येऊन पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरात सात दिवस अखंड हरिनाम सप्ताह करतात हे अतिशय अवघड आहे.परंतु ते हे कार्य पार पाडत आहेत त्यामुळे ते कौतुकास पात्र आहेत.

मोहोळ तालुक्याचेआमदार व पंढरपूर निवासी श्री.राजेंद्र खरे यांच्या माध्यमातून दिंडीला या पुढील काळात जी जी मदत लागेल ती भरभरून केली जाईल.दिंडीने आपले असेच कार्य चालू ठेवावे असेही आवाहन तृप्ती ताई यांनी यावेळी केले.

मान्यवरांचे स्वागत सप्ताहाचे संयोजक व अजामेळा दिंडी क्रमांक २६ चे सरचिटणीस पत्रकार श्री.ह.भ.प.मधुकर महाराज गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ संजीवनीताई मंडलिक / गायकवाड यांनी केले.

img 20260227 wa0491

श्री क्षेत्र पंढरपूर येथे अजामेळा दिंडीच्या सप्ताहाला भेट देऊन भाविकांना संबोधित करताना व सप्ताह ला शुभेच्छा देताना सौ तृप्ती ताई राजेंद्र खरे समवेत मान्यवर

Related posts

समर्थ शैक्षणिक संकुलात महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी !!

Chief Editor

कौतुकास्पद….राळेगण (ता.जुन्नर) येथे संपन्न झाला माहेरवाशीनींचा मेळावा !!

Chief Editor

जवळे (ता.आंबेगाव) ग्रामपंचायत प्रशासनाची तत्परता ; मृत गाय आणि मेलेल्या कोंबड्यांची तत्काळ लावली विल्हेवाट !!

Chief Editor

Leave a Comment