सामाजिक

जिल्हा परिषद शिंगवे शाळेला A+ श्रेणी मानांकित !!

img 20260225 wa0310

प्रतिनिधी – समीर गोरडे

पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्याच्या पूर्व सीमेवर असणारी एसक्युएएफ अंतर्गत येणाऱ्या बाह्य मुल्यांकनात जिल्हा परिषद माॅडेल स्कुल शिंगवे विद्यार्थ्यांना मिळाणार्या शिक्षण सुविधा, शाळेमध्ये असलेल्या प्राथमिक सुविधा, उपलब्ध असलेले कुशल मनुष्यबळ,येथे गुववत्ता वाढ, शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षा तसेच भौतिक सुविधा आदींसह शाळा गुणवत्ता व शैक्षणिक मूल्यांकनात झालेल्या बाहय मूल्यमापनामध्ये शिंगवे शाळेला A+ श्रेणी मिळाली.

img 20260225 wa0307

शिंगवे शाळा सर्व निकषांवर उत्तम कामगिरी बजावली या बद्दल मा. गजानन पाटील सुख्य कार्य अधिकारी यांनी शाळेचे अभिनंदन केले असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक नवनाथ सिनलकर यांनी दिली.

शिष्यवृत्ती इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा आणि मार्गदर्शन पर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक रामभाऊ सातपुते, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समीर गोरडे,उपाध्यक्ष रेखाताई पाबळे,माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष गणेश पंडीत, मा.ग्रामपंचायत सदस्य सोपान पाबळे,पालक,शिक्षक उपस्थित होते. वर्गशिक्षक जालिंदर पोंदे यांनी सूत्रसंचालन केले व वर्गशिक्षक अशोक लोखंडे सर यांनी आभार मानले.

img 20260225 wa0309
fb img 1771121541695
fb img 1771121534243

Related posts

जांभोरी येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार व जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न !!

Chief Editor

धामणी येथे श्रीकृष्ण जन्मोत्सव शताब्दी महोत्सवाची धर्मध्वज उभारणीने मंगलमय सुरुवात

Chief Editor

मान्सून अपडेट – महाराष्ट्रात पावसाचा जोर कधी वाढणार ? हवामान विभागाचा मोठा अंदाज; ‘या’ तारखेनंतरच बरसणार धारा !!

Chief Editor

Leave a Comment