सामाजिक

मनुष्याला सर्व सोंगे आणता येतात;परंतु परमार्थ आणि पैशाचे सोंग आणता येत नाही- ह.भ.प.लक्ष्मण महाराज नागरे

img 20260217 wa0753

पंचनामा प्रतिनिधी (प्रा.अरुण गोरडे)- आई,वडिलांची सेवा हि ईश्वरी सेवा आहे.मनुष्याला सर्व सोंगे आणता येतात,परंतु परमार्थ आणि पैशाचे सोंग आणता येत नाही असे प्रतिपादन ह.भ.प.लक्ष्मण महाराज नागरे यांनी लोणी (ता.आंबेगाव ) येथे केले.

लोणी या ठिकाणी महाशिवरात्री निमित्त आयोजीत केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या काल्याच्या किर्तन रूपी सेवेत नागरे महाराज बोलत होते.नागरे महाराजांनी या वेळेस परमार्थ कसा करावा व तो कशा प्रकारचा असावा परमार्थतून प्राप्ती व समाजाने संतांच्या विचाराचे अनुकरण करावे व समाधान व पुण्याची प्राप्ती करावी असे सांगितले. यावेळी टाळकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.भाविकाची संख्या लक्षनिय होती.महिला वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होता.

fb img 1771121541695

काल्याच्या किर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन केले होते.अडीच ते तीन हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.ग्रामस्थांचं अचूक नियोजन, शिस्तबद्धपणा याचे एक अनोखे दर्शन यावेळी घडले.कीर्तनास येणाऱ्या सर्व भाविक स्त्रोत्यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

नऊ दिवस चाललेला किर्तन सोहळ्याचा आजच्या कार्यक्रमाने समारोप झाला.या कार्यक्रामाचे नियोजन समस्थ ग्रामस्थ लोणी यांनी केले होते.

Related posts

आंबेगाव तालुक्यातील विविध गावांत हनुमान जन्मोत्सव उत्साहात संपन्न !!

Chief Editor

रांजणी गावच्या शिरपेचात मनाचा तुरा; ८० वर्षापासून नाट्य परंपरा जपणाऱ्या समाज विकास नाट्य मंडळाला नाट्य गौरव सन्मान-२०२६ पुरस्कार प्रदान !!

Chief Editor

जारकरवाडी फाटा–लोणी (धामणी) रस्त्यालगतची झाडे-झुडपे अखेर हटवली; मात्र खड्ड्यांचे साम्राज्य कायम !!

Chief Editor

Leave a Comment