सामाजिक

जांभोरी येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार व जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न !!

1010252307
1010252311

पंचनामा प्रतिनिधी – जांभोरी येथे जांभोरी ग्राम विकास फाउंडेशनच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला जीवन गौरव पुरस्कार व जांभोरी येथील न्यु इंग्लिश स्कूल जांभोरी व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील एकुण २०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.शामराव बांबळे उपसभापती खरेदी – विक्री संघ आंबेगाव यांनी भुषविले तर प्रमुख पाहुणे सौ.ज्योतीताई प्रवीण पारधी उपसभापती पंचायत समिती आंबेगाव ह्या उपस्थित होत्या.

यावेळी श्री.सिताराम रखमा जोशी यांना जांभोरी ग्राम विकास फाउंडेशनच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री.पुनाजी पारधी,उपाध्यक्ष दिलीप गिंरगे व सर्व सन्माननीय संचालक
यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.तसेच इयत्ता दहावी मध्ये प्रथम तीन क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना फाऊंडेशनचे आधारस्तंभ श्री.प्रकाश केंगले साहेब यांच्या कडून अनुक्रमे ३०००/-,२०००/-,१०००/- रोख रक्कम व सन्मानचिन्ह व प्रत्येकी एक छत्री देऊन गौरविण्यात आले.नियोजित वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले श्री.हनुमंत गिरंगे, श्री.विजय बांबळे, नारायण मडके महाराज यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.तसेच प्रा.श्री.रूपेश केंगले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.सर्व विद्यार्थ्यांसाठी सन्मानचिन्ह श्री.श्रीरंग व श्री.सुरेश केंगले यांनी दिले.

1010252309

याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पारधी,लिंबाजी केंगले नवनाथ केंगले पाटील,पेसा अध्यक्ष मारूती केंगले,किसन शेळके,संजय केंगले सर,मुख्याध्यापक श्री.के.जी.केंगले सर, अंकुश गिरंगे,भिमा केंगले, दुंदा किरवे, युवानेते मारूती केंगले उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री किरण भवारी यांनी केले तर ज्ञानेश्वर पारधी यांनी संस्थेच्या कार्याची सविस्तर माहिती दिली व आभार प्रदर्शन श्री.शिवराम केंगले यांनी मानले.

1010252307

Related posts

पशुवैद्यकीय अधिकार्यांचे विविध मागण्यांसंदर्भात आंदोलन !!

Chief Editor

मनुष्याला सर्व सोंगे आणता येतात;परंतु परमार्थ आणि पैशाचे सोंग आणता येत नाही- ह.भ.प.लक्ष्मण महाराज नागरे

Chief Editor

गुरुकुलचा समर्थ शेळके बारावी सी.बी.एसई.बोर्डामध्ये जुन्नर-आंबेगाव तालुक्यातून प्रथम !!

Chief Editor

Leave a Comment