सामाजिक

रक्षाबंधन सणानिमित्त बंदी निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे उद्घाटन ; कारागृह हे केवळ शिक्षेचे ठिकाण नसून ते सुधारगृह- डॉ. सुहास वारके

1010698235

पंचनामा प्रतिनिधी – बंदींच्या कलागुणांना वाव मिळावा आणि वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने “रक्षाबंधन” सणाचे औचित्य साधून बंदी निर्मित वस्तूंच्या प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे उद्घाटन कारागृह व सुधारसेवा महासंचालक डॉ. सुहास वारके यांच्या उपस्थितीत सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीमती पूजा पवार-साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले. “कारागृह हे केवळ शिक्षेचे ठिकाण नसून ते सुधारगृह आहे. बंदींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध कौशल्याधारित प्रशिक्षणाद्वारे त्यांना रोजगारक्षम बनविणे आवश्यक असल्याचे मत श्री. वारके यांनी व्यक्त केले.

“सुधारणा व पुनर्वसन” हा कारागृह विभागाचे ब्रीद असून, कारागृहातील बंदी हा समाजाचा एक घटक आहे. महाराष्ट्र कारागृह उद्योगांतर्गत विविध कौशल्याधारित प्रशिक्षण दिले जाते.

1010698235

या प्रशिक्षणातून बंदींनी तयार केलेल्या या प्रदर्शनात बंदींनी तयार केलेले फर्निचर, देवघर, शोभेच्या वस्तू, पर्यावरणपूरक गणेशमूर्ती, राख्या, कपडे, हस्तमाल, टॉवेल, बेडशीट, चादरी, बेकरी पदार्थ, बिस्कीट तसेच विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कौशल्याधारित प्रशिक्षणामुळे कारागृहातून मुक्त झाल्यानंतर त्यांच्या कौशल्याच्या जोरावर आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊन ते समाजात सन्मानाने जीवन जगू शकतील.” असे श्री. वारके म्हणाले.

बंदींनी तयार केलेल्या वस्तूंचे कौतुक करून, कारागृह प्रशासन व बंदींच्या सकारात्मक प्रयत्नांना समाजाने पाठबळ देण्यात येत आहे. नागरिकांनी या प्रदर्शनातून बंदी निर्मित वस्तू खरेदी करून त्यांच्या पुनर्वसनास हातभार लावावा, असे आवाहन अभिनेत्री पूजा पवार यांनी केले आहे.

यावेळी माहेर महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा श्रीमती विद्या म्हात्रे उपस्थित होत्या.

1010688861
1010688815

Related posts

समर्थ आयटीआयच्या ४६ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये निवड !!

Chief Editor

गणपती बाप्पा चे आगमन अवघ्या काही दिवसांवर; गणेश मूर्ती बनविण्याची लगबग अंतिम टप्प्यात !!

Chief Editor

समर्थ फार्मसी च्या विद्यार्थ्यांचे खो-खो स्पर्धेमध्ये दैदीप्यमान यश !!

Chief Editor

Leave a Comment