सामाजिक

लेण्याद्री येथे ऐतिहासिक स्थळे संवर्धन कार्यशाळा संपन्न !!

img 20260218 wa0489
img 20260218 wa0488

पंचनामा बेल्हे प्रतिनिधी – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना (NSS) आणि समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ लॉ कॉलेज,बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय एकदिवसीय विशेष शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.

‘ऐतिहासिक स्थळ दत्तक योजना’ अंतर्गत ऐतिहासिक स्थळ संवर्धन कार्यशाळा लेण्याद्री येथे नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली.या कार्यशाळेसाठी विविध महाविद्यालयातील ५० स्वयंसेवक सहभागी झाले होते.
लेण्याद्री येथील ऐतिहासिक वारसा जतन व संवर्धनाबाबत लेणी अभ्यासक व मार्गदर्शक सिद्धार्थ कसबे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.स्वच्छता,परिसर संवर्धन,जनजागृती तसेच ऐतिहासिक ठिकाणांच्या संरक्षणाची जबाबदारी नागरिकांनी कशी घ्यावी,यावर सविस्तर चर्चा झाली.

कार्यशाळेदरम्यान स्वयंसेवकांनी प्रत्यक्ष श्रमदान करून परिसर स्वच्छता केला.ऐतिहासिक स्थळांचे महत्त्व,त्यांचे जतन आणि पुढील पिढ्यांसाठी वारसा जपण्याची गरज याबाबत विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक जाणीव निर्माण झाली.

fb img 1771121534243

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समर्थ लॉ कॉलेजचे उपप्राचार्य प्रा.शिवाजी कुमकर, डॉ.शरद पारखे,कार्यक्रम अधिकारी प्रा.सोमनाथ गाडेकर,प्रा.भूषण दिघे,प्रा.भारती निकम, प्रा. सोनाली येवले यांनी परिश्रम घेतले.अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारी, सांस्कृतिक जाणीव व पर्यावरणपूरक दृष्टिकोन विकसित होतो,असे मत श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टचे सचिव शंकरराव ताम्हाणे यांनी व्यक्त केले.

Related posts

शिरदाळे (ता.आंबेगाव ) येथील तरुणांचा अभिनव उपक्रम;महाशिवरात्री निमित्ताने गावात राबवले ग्राम स्वच्छता अभियान!!

Chief Editor

धामणी गावात नारी शक्ती बोलती झाली;महिला दिनी उलगडली स्वकर्तुत्वाची गाथा !!

Chief Editor

ग्रामीण विकास केंद्र, जामखेडतर्फे लोककलावंत महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न !!

Chief Editor

Leave a Comment