सामाजिक

पॅरालिसिसचा झटका आलेला असतानाही त्यांनी… दिग्दर्शक प्रविण तरडेंनी उघड केला मोहन जोशींचा ‘तो’ थक्क करणारा थरार!

1009611363
1009611363

पंचनामा प्रतिनिधी – दिग्दर्शक प्रविण तरडे यांचा ‘देऊळ बंद २’ हा चित्रपट सध्या चित्रपटगृहात धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटात स्वामी समर्थांच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना थक्क केले आहे. दरम्यान, ‘लोकसत्ता’ला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत प्रविण तरडेंनी मोहन जोशी यांच्याबद्दल एक असा धक्कादायक आणि डोळ्यात पाणी आणणारा खुलासा केला आहे, जो ऐकून संपूर्ण सिनेसृष्टी या ज्येष्ठ नटाच्या जिद्दीला सलाम करत आहे.

प्रविण तरडेंनी सांगितले की, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मोहन जोशी यांना ‘पॅरालिसिसचा’ (अर्धांगवायू) सौम्य झटका आला होता. त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक होती आणि डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला होता. चित्रपटाचे शूटिंग थांबण्याची आणि लांबणीवर पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. मात्र, अशा गंभीर परिस्थितीतही मोहन जोशी यांनी कमालीचे धाडस आणि कामाप्रती असलेली निष्ठा दाखवली.

​”त्यांच्या शरीराची एक बाजू व्यवस्थित काम करत नव्हती, बोलताना त्रास होत होता, तरीही त्यांनी ‘शूटिंग थांबवायचं नाही’ असा निर्णय घेतला आणि कॅमेऱ्याला सामोरे गेले,” असे तरडेंनी भावूक होत सांगितले. आजारपणावर मात करत त्यांनी स्वामी समर्थांचे कठीण सीन अत्यंत ताकदीने पूर्ण केले. एका खऱ्या कलाकाराची कलेप्रती असलेली ही भक्ती आणि जिद्द सध्या सोशल मीडियावर कमालीची व्हायरल होत असून नेटकरी मोहन जोशी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

fb img 1774661449199

Related posts

नवसाला पावणारी करवडीची जानुबाई आणि सलग ४० वर्षे नवस फेडणारी तमाशा सम्राज्ञी मंगलताई !!

Chief Editor

भीमा नदीच्या पाणीपातळीत वाढ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा !!

Chief Editor

समर्थ च्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय प्रकल्प स्पर्धेत यश !!

Chief Editor

Leave a Comment