
पंचनामा प्रतिनिधी – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोबळेवाडी (जारकरवाडी) येथील विद्यार्थ्यांना सह्याद्री अॅग्रोव्हेट व हिंगे पाटील कृषी उद्योग यांच्या माध्यमातून स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले.
यावेळी श्री.रामचंद्र जयराम ढोबळे (मा. उपसभापती पंचायत समिती आंबेगाव, संचालक भीमाशंकर सहकारी साखर कारखाना)
श्री.सचिन बापू टाव्हरे (उपसरपंच जारकरवाडी ) श्री.भागाजी भांड (एरिया सेल्स मॅनेजर सह्याद्री अॅग्रोव्हेट),श्री.समीर ढोबळे (अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती ) श्री. विशाल साबळे (विक्री प्रतिनिधी सह्याद्री अॅग्रोव्हेट)
श्री. रोशन हिंगे (हिंगे पाटील कृषी उद्योग पारगाव,श्री.अशोक हिंगे (मुख्याध्यापक ) हिंगे मॅडम आणि ढोबळेवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.


सह्याद्री ऍग्रोव्हेट ह्या कंपनीने समाजाप्रती आपलं देण लागतो. हा हेतू डोळ्यासमोर ठेऊन कंपनीला जो काही नफा होतो त्यातील 25 टक्के नफा हा समाजातील उपक्रम राबविण्यासाठी वापरला जातो .त्याचप्रमाणे समाजात ज्या 10 वर्षाच्या आतील ज्या मुलीचे वडील या जगात नाही अश्या गरजू मुलींना सह्याद्री कंपनी दत्तक घेऊन त्यांच्या शालेय शिक्षणाची जबाबदारी सह्याद्री कंपनी घेते. त्याच प्रमाणे गाईचा संसार ह्या संकल्पनेतून अनेक उपक्रम राबविले जातात. आणि आम्ही पण जिल्हा परिषद शाळा जारकरवाडी या ठिकाणी शिकून लहानाचे मोठे झालो. समाजाप्रती असणारे ऋण या माध्यमातून आम्हाला काहीतरी करता येते म्हणून सहयाद्री ऍग्रोव्हेट कंपनीचे मालक मा. श्री. नितीन हासे सर यांनी आम्हाला संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल हासे सरांना पण धन्यवाद दिले. अश्या पद्धतीची माहिती कंपनीचे एरिया सेल्स मॅनेजर भागाजी भांड साहेब यांनी दिली.



हा सामाजिक उपक्रम सह्याद्री कंपनीने राबविल्याबद्दल गावचे उपसरपंच सचिन टाव्हरे यानी आभार मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. हिंगे सर यांनी केले.श्री.रामचंद्र ढोबळे यांनी बॅग वाटप उपक्रम राबविल्याबद्दल श्री. भागाजी भांड आणि सह्याद्री टीमचे विशेष कौतुक केले. त्यांनी सांगितले जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या कमी होत चालली आहे. असे सामाजिक उपक्रम राबविल्यामुळे अनेक गरजू विद्यार्थ्यांना यातून नक्कीच फायदा होईल आणि त्यांनी पालकांना आव्हाण केले कि आपली मुले English मेडीयम ला न घालता जिल्हा परिषद शाळेत टाकली पाहिजेत. म्हणजे जिल्हा परिषद शाळा बंद पडणार नाही. अश्या प्रकारे विविध मान्यवरांनी सह्याद्री ऍग्रोव्हेट कंपनीचे विशेष असे कौतुक केले व हिंगे पाटील कृषी उद्योग यांच्या माध्यमातून मुलांना खावू वाटप करून कार्यक्रमांची सांगता करण्यात आली

