सामाजिक

आंबेगाव तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा मान उंचावला ; सावकार अरगडे, जयश्री मोटे व अशोक हिंगे यांची ‘आयडॉल टीचर’ पुरस्कारासाठी निवड !!

img 20261107 wa0389
1011606869

पंचनामा प्रतिनिधी – लोणी (ता. आंबेगाव) : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले उल्लेखनीय कार्य, नावीन्यपूर्ण अध्यापन पद्धती आणि विद्यार्थ्यांशी जपलेले जिव्हाळ्याचे नाते यांची दखल घेत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी), पुणे यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी राज्यातील ३२ शिक्षकांची ‘आयडॉल टीचर’ म्हणून निवड करण्यात आली आहे. यामध्ये आंबेगाव तालुक्यातील सावकार बबन अरगडे (अवसरी बुद्रुक), जयश्री अरुण मोटे (लोणी) आणि अशोक हिंगे (ढोबळेवाडी) या तीन प्राथमिक शिक्षकांचा समावेश आहे.

1011606842

शिक्षण क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य करत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबतच त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी या शिक्षकांनी विशेष प्रयत्न केले आहेत. पारंपरिक अध्यापन पद्धतीसोबतच आधुनिक व नावीन्यपूर्ण शिक्षण पद्धतींचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्याचे काम त्यांनी केले आहे. विद्यार्थ्यांशी आपुलकीचे नाते निर्माण करून त्यांच्या आवडत्या शिक्षकांमध्ये स्थान मिळविण्यातही त्यांनी यश मिळविले आहे.

एससीईआरटीसारख्या राज्यस्तरीय संस्थेकडून त्यांच्या कार्याची दखल घेऊन ‘आयडॉल टीचर’ म्हणून निवड झाल्याने आंबेगाव तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या गुणवत्तापूर्ण कार्याला मिळालेली ही पावती असून, तालुक्यातील शिक्षकांसाठीही ती निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

या तिन्ही शिक्षकांचे शिक्षकवर्ग, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ तसेच विविध स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

1011605851

Related posts

दीपमाळ गावाच्या वैभवाचे प्रतीक ; धामणीत लोकसहभागातून तीन दगडी दीपमाळा उभारण्याचा संकल्प; दुसऱ्या दीपमाळेच्या कामाचा शुभारंभ !!

Chief Editor

आंबेगावात शिक्षक, पदवीधर मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; सकाळपासून मतदान केंद्रांवर गर्दी; लोकशाहीच्या उत्सवात मतदारांचा उत्साह !!

Chief Editor

समर्थ संकुलात वन्यजीव व मानव संघर्ष या विषयावर मेजर रमेश खरमाळे यांचे मार्गदर्शन !!

Chief Editor

Leave a Comment