सामाजिक

आंबेगावात शिक्षक, पदवीधर मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; सकाळपासून मतदान केंद्रांवर गर्दी; लोकशाहीच्या उत्सवात मतदारांचा उत्साह !!

1011435336
1011435497

पंचनामा पारगाव प्रतिनिधी – पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि. २३) आंबेगाव तालुक्यात मतदानाला उत्साहात सुरुवात झाली. सकाळपासूनच शिक्षक व पदवीधर मतदारांनी मतदान केंद्रांवर हजेरी लावत आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्रांच्या परिसरात शांततापूर्ण वातावरण असून, निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे.

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होत आहे. पुणे जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघासाठी ८८ हजार २०२, तर शिक्षक मतदारसंघासाठी १६ हजार ८८२ मतदार नोंदणीकृत आहेत. दोन्ही मतदारसंघांत मिळून जिल्ह्यातील एक लाख पाच हजारांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत.

1011435336

आंबेगाव तालुक्यातील मतदान केंद्रांवर सकाळच्या सत्रात मतदारांची लगबग दिसून आली. शिक्षक मतदारांनी शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित प्रश्नांना प्राधान्य देणारे नेतृत्व निवडण्यासाठी मतदान केले, तर पदवीधर मतदारांनी आपल्या अपेक्षा आणि प्रश्नांच्या अनुषंगाने मतदानाचा कौल दिला.

मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, तसेच मतदान केंद्रांच्या परिसरात अनावश्यक गर्दी होऊ नये, यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. मतदानाच्या दिवशी तालुक्यातील काही ठिकाणचे आठवडे बाजार बंद ठेवण्यात आले आहेत. यामध्ये आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक आणि घोडेगाव येथील बाजारांचा समावेश आहे.

पुणे विभागातील पदवीधर मतदारसंघासाठी ४७, तर शिक्षक मतदारसंघासाठी ३० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दोन्ही मतदारसंघांची मतमोजणी २७ ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यामुळे आंबेगावसह संपूर्ण पुणे विभागाचे लक्ष आता मतदानाच्या टक्केवारीकडे आणि निकालाकडे लागले आहे.

आंबेगाव तालुक्यातील मतदान केंद्रावर मतदानासाठी आलेले शिक्षक व पदवीधर मतदार

Related posts

गुरु पौणिमेला धामणीत खंडोबाला फुलांची सजावट !!

Chief Editor

जागतिक आदिवासी दिन जांभोरी येथे उत्साहात साजरा !!

Chief Editor

ग्रामपंचायत जवळे येथे शिवराज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात संपन्न !!

Chief Editor

Leave a Comment