सामाजिक

न्यू इंग्लिश स्कूल जांभोरी येथे विद्यार्थ्यांना पी.टी. ड्रेसचे वाटप; गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसांचे प्रोत्साहन !!

1011457528

पंचनामा प्रतिनिधी जांभोरी : आंबेगाव तालुक्यातील जांभोरी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये रविवार, दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांना पी.टी. ड्रेसचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाप्रेम, शिस्त आणि आत्मविश्वास वाढावा, तसेच शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

1011457528

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामविकास प्रतिष्ठान, जांभोरी-नांदूरकीचीवाडीचे अध्यक्ष अंकुश केंगले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मारुतीदादा केंगले, जांभोरी गावचे उपसरपंच बबन केंगले, माजी उपसरपंच प्रमोद केंगले, माजी सैनिक मुरलीधर केंगले, माजी विद्यार्थी भीमा केंगले, किसन केंगले, रमेश झांजरे, शरद बांबळे, विलास केंगले, दिगंबर आढारी, मीना काठे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष पांडुरंग केंगले, पैलवान सुनील केंगले आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक काळू केंगले सर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी अंकुश केंगले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दहावीच्या परीक्षेतील यशाचे महत्त्व अधोरेखित केले. न्यू इंग्लिश स्कूल जांभोरी विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल दरवर्षी १०० टक्के लागत असून, यंदाही विद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

तसेच, इयत्ता दहावीच्या परीक्षेत ८० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात बक्षिसे देण्यात येतील, अशी प्रोत्साहनपर घोषणा अंकुश केंगले यांनी केली. या घोषणेमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी नवी प्रेरणा मिळणार असून, अधिकाधिक विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

1011457526

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मारुतीदादा केंगले यांनीही मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी प्रोत्साहित केले. या वेळी इयत्ता आठवी, नववी आणि दहावीतील विद्यार्थी-विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे मुख्याध्यापक काळू केंगले सर यांनी केले, तर अंकुश केंगले साहेब यांनी उपस्थितांचे आभार मानले.

माजी विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी पुढाकार घेत पी.टी. ड्रेसचे वाटप केल्याने परिसरातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 399503
1011434447

Related posts

लेण्याद्री येथे ऐतिहासिक स्थळे संवर्धन कार्यशाळा संपन्न !!

Chief Editor

जारकरवाडी जिल्हा परिषद शाळेत गोपाळकाला उत्साहात साजरा !!

Chief Editor

जल संवर्धनाच्या दिशेने संत निरंकारी मिशनचा सशक्त उपक्रम: ‘प्रोजेक्ट अमृत’चा चौथा टप्पा; पुण्यात एकाच वेळी घोडनदी, कुकडी, मीना नदी सह होणार ४२ ठिकाणी जल स्वच्छता मोहीम !!

Chief Editor

Leave a Comment