
पंचनामा प्रतिनिधी – जारकरवाडी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जारकरवाडी येथे आज गोपाळकाला उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

कार्यक्रमाची सुरुवात श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण, राधा व गोपाळ यांच्या वेशभूषेत सहभागी होत उपस्थितांची मने जिंकली. पारंपरिक गाणी, भजने आणि नृत्याने शाळेचे वातावरण भक्तिमय व आनंदमय झाले.

यानंतर विद्यार्थ्यांनी ‘गोविंदा रे गोपाळा’च्या जयघोषात दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटला. विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे मानवी मनोरा रचत दहीहंडी फोडली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना एकी, सहकार्य, संघभावना आणि परस्पर मदतीचे महत्त्व समजावून देण्यात आले.

शाळेचे मुख्याध्यापक श्री. शिवाजी मारुती चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक श्री. अब्दुलरहीमान जलील इनामदार, श्री. गोरक्ष विष्णू उकिरडे, सौ. रेखा सुनील वळसे, सौ. उज्वला नंदकुमार लंगडे, सौ. सुनिता गोपाळ रोडे, श्री. अशोक नामदेव किर्वे व श्री. सुदर्शन गंगाधर रासकर यांनी कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन केले.

या प्रसंगी पालक व ग्रामस्थांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. परंपरा, संस्कृती आणि आनंद यांचा सुंदर संगम घडविणारा गोपाळकाला उत्सव उत्साहात संपन्न झाला.




