
लोणी (ता. आंबेगाव) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, लोणी येथे प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी) तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला. ग्रामपंचायत लोणीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शनिवार दि. ५ सप्टेंबर रोजी झालेल्या कार्यक्रमास सरपंच डॉ. श्री. सावळेराम आबाजी नाईक, उपसरपंच श्री. राजेंद्र वामन वाळुंज, ग्रामपंचायत सदस्य सौ. आदिका संपत खेमणे, श्री. प्रकाश मधुकर गायकवाड, सौ. स्वाती दिनकर वाळुंज, श्री. राहुल परशुराम आढाव, श्री. प्रदीप भवरीलाल कोचर, सौ. मंगल कैलास गायकवाड, सौ. पुष्पा बबन रोकडे, सौ. करिश्मा राहुल सोनवणे, ग्रामसेवक श्री. मनोज सोनवणे तसेच ग्रामपंचायत अधिकारी श्री. संतोष बबन बोडके उपस्थित होते.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष नाथू वाळुंज, प्रसाद उदागे, चेतन वाळुंज, गोटीराम गायकवाड, गौरव रोकडे, अंगणवाडी सेविका, विद्यार्थी व पालक यांचीही उपस्थिती होती.
कार्यक्रमात प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांनी भविष्यातही शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कामगिरी करावी, यासाठी उपस्थित मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास अध्यक्ष श्री. योगेश मारुती वाळुंज (शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष) व उपाध्यक्ष सौ. वर्षाताई अविनाश आढाव यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, अंगणवाडी सेविका, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.






