
पंचनामा प्रतिनिधी – डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ (DBATU), लोणेरे आणि समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी व समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी, बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरमहाविद्यालयीन खो-खो व कबड्डी स्पर्धा आणि निवड चाचणी समर्थ क्रीडा संकुल बेल्हे येथे उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत DBATU, लोणेरेच्या संघांनी खो-खो व कबड्डीच्या मुलांच्या आणि मुलींच्या अशा चारही गटांत विजेतेपद पटकावून वर्चस्व सिद्ध केले. या स्पर्धेत समर्थ फार्मसीच्या विद्यार्थ्यांची विद्यापीठस्तरीय निवड चाचणीसाठी निवड करण्यात आली.
स्पर्धेचा प्रारंभ हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमापूजनाने व सरस्वती पूजनाने झाला. यावेळी क्रीडा संचालक प्रा. एच.पी. नरसुडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खेळातील शिस्त, सातत्य, सांघिक भावना, खिलाडूवृत्ती आणि क्रीडा क्षेत्रातील संधी यांचे महत्त्व विशद केले. विविध महाविद्यालयांतील खेळाडूंनी स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
खो-खो मुलांच्या गटात DBATU, लोणेरे विजेता, तर एईएस कॉलेज ऑफ फार्मसी, बारामती उपविजेता ठरले. मुलींच्या गटात DBATU, लोणेरेने विजेतेपद, तर नवसह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, नायगाव (नसरापूर) यांनी उपविजेतेपद मिळवले. कबड्डी मुलांच्या गटात DBATU, लोणेरे विजेता, तर डेलोनिक्स सोसायटीचे बारामती कॉलेज ऑफ फार्मसी उपविजेता ठरले. मुलींच्या गटात DBATU, लोणेरेने प्रथम क्रमांक, तर स्कूल ऑफ फार्मसी, बारामतीने द्वितीय क्रमांक मिळवला.
समर्थच्या विद्यार्थ्यांची निवड : कबड्डीमध्ये समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या ऋषिकेश भारती, लसानी शेख, वैष्णवी तांबे व मुस्कान पठाण, तर समर्थ कॉलेज ऑफ फार्मसीच्या भरत धुंडाळ, मंगेश पिंगट, समीक्षा अरगडे व पायल यादव यांची पुणे विभागीय संघात निवड झाली.
खो-खोमध्ये समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या प्रथमेश शेळके, श्रावणी कुटे, अमृता जारकड व कोमल घोडे, तर समर्थ कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्रणव गायकवाड, दत्तात्रय बोराडे, वरद वराणसे, शुभांगी पोहकर, मुस्कान अलाबी व ऋतुजा भगत यांची निवड करण्यात आली.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे क्रीडा समन्वयक डॉ. सचिन भालेकर आणि समर्थ कॉलेज ऑफ फार्मसीचे क्रीडा समन्वयक प्रा. प्रतीक भांड यांनी विशेष परिश्रम घेतले. क्रीडा विभाग, प्राध्यापकवृंद, कर्मचारी व स्वयंसेवकांचे सहकार्य लाभले.
या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचे आणि निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा. राजीव सावंत, समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. कुलदीप रामटेके, समर्थ कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. संतोष घुले, प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर, क्रीडा संचालक प्रा. एच. पी. नरसुडे, क्रीडा शिक्षक प्रा. सुरेश काकडे व प्रा. विनायक वऱ्हाडी तसेच संस्थेतील सर्व प्राचार्य व विभागप्रमुख यांनी अभिनंदन केले.


