Uncategorizedसामाजिक

निरगुडसर (ता.आंबेगाव ) येथील पंडित जवाहरलाल नेहरू व दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी !!

img 20260223 wa0473
img 20260223 wa0473

पंचनामा पारगाव (शिंगवे) प्रतिनिधी – निरगुडसर (ता.आंबेगाव ) येथील पंडित जवाहरलाल नेहरू व दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात शिवजयंती मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात पार पडली.
यावेळी विद्यार्थांनी ” जय भवानी, जय शिवाजी ” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

शिवजयंती निमित्ताने विद्यालायाने महाराजाच्या जीवनावर आधारित सोन्याचा नांगर चालवताना बालशिवबा असा जिवंत देखावा सादर केला होता. त्यात शाळेतील लेझीम पथकाने सुद्धा छान अशी साथ दिली होती.

विद्यालयात शिवपूजन झाल्यानंतर शिवजयंयी सोहळयासाठी विद्यालयातून मुलं नेहमी प्रमाणे गावला फेरी मारली आणि गावच्या वेशित मिरवणूक आल्यावर निरगुडेश्वर शिक्षण विकास मंडळाचे
अध्यक्ष ॲड.प्रदीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार सोहळा साजरा करण्यात आला.

शालेय विद्यार्थी श्रावणी तूळेकर व ईश्वरी ढोबळे छत्रपतीच्या जीवनावर आधारीत भाषण केले. शिवजयंतीसोहळ्या साठी गावातील विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्राचार्य कांताराम टाव्हारे , पर्यवेक्षक संतोष वळसे, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तेर कर्मचारी यांनी विशेष परीश्रम घेतले.या वेळी विद्यार्थी व आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते.

fb img 1771121534243

Related posts

शिरदाळे (ता.आंबेगाव) येथे ज्वारी पिक काढणीला सुरवात !!

Chief Editor

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद !!

Chief Editor

जागतिक महिला दिनानिमित्ताने लोणी (धामणी) ग्रामपंचायतीकडून महिला शक्तीचा सन्मान !!

Chief Editor

Leave a Comment