सामाजिक

पोलीस पाटील यांची पत्रकाराला कायमचा बंदोबस्त करण्याची धमकी,गुन्हा दाखल;अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रकार !!

img 20260502 wa0318

पंचनामा पुणे प्रतिनिधी – देवस्थान ट्रस्टच्या विरोधात बातम्या केल्यामुळे ट्रस्टचे सचिव तथा कामगार पोलीस पाटील गोपीनाथ बाळासाहेब ढगे यांनी पत्रकार आशिष ढगे यांना फौजदारी गुन्ह्यात अडकविण्याचे व कायमचा बंदोबस्त करण्याची लेखी धमकी दिल्याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबदची माहिती अशी की, कळस बु.(ता.अकोले) येथील देवस्थान ट्रस्टच्या विरोधात पत्रकार आशिष ढगे यांनी त्यांचे न्यूज पोर्टलवर ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने घटनेत विश्वस्त हे तह्यात म्हणजे कायम करण्याचा तसेच विश्वस्त मंडळातील रिक्त जागा भरण्याचा अधिकार ही विश्वस्त मंडळाला ठेवण्याचा निर्णय बाबद बातम्या केल्या. यामुळे कळसच्या नागरिकांमध्ये जनजागृती केल्यामुळे गोपीनाथ ढगे यांनी एक प्रसिद्धी पत्रक काढून पत्रकार हे ब्लॅक मेलींग करून पैसे कमविण्यासाठी हे धंदे करीत असल्याचा आरोप केला असून बातमी देणे बंद न केल्यास फौजदारी गुन्ह्यात अडकविण्याचे तसेच गावकऱ्यांच्या मदतीने कायमचा बंदोबस्त करण्याची धमकी दिली आहे.

img 20260502 wa0318

यासंदर्भात पत्रकार आशिष ढगे यांच्या फिर्यादीवरून पुणे जिल्ह्यातील दक्षिण म्हाळुंगे एम. आय.डी.सी.पोलीस स्टेशन गुन्हा रजी. 719/ 2026 बी.एन.एस. 351(4) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक आर. एम. घुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रेंगडे हे करीत आहे.

गावचे पोलीस पाटील हे गावात कायदा अन सुव्यवस्था राखणे चे काम असते, तंटामुक्त गाव समितीचे सचिव म्हणून गावात समनव्य राखणे, गावातील परस्पर विरोधी वाद गावात मिटवणे असे काम असताना उलट आपल्या पदाचा दुरूपयोग करून पत्रकाराला व त्याला सहाय्य करणाऱ्यांचा कायम चा बंदोबस्त करण्याची लेखी धमकी दिली आहे.

आपल्या कर्त्यव्यात कसूर केली असून अधिकाराचा गैरवापर केला आहे. त्यामुळे पोलीस पाटील गोपीनाथ ढगे यांच्या पासून जीवितास धोका निर्माण झाला असून मी न्यायालयातही दाद मागणार आहे तरी त्यांच्यावर पोलिसांनी तातडीने कारवाई करावी अशी मागणी आशिष ढगे यांनी केली आहे.

Related posts

महिमा थोर वाढेल तुमचा ; धामणी येथील श्रीकृष्ण जन्मोत्सव अखंड हरिनाम सप्ताहाच्या शताब्दी महोत्सवात ह.भ.प. माऊली महाराज कदम यांची सहावी पुष्पसेवा !!

Chief Editor

सुकन्या समृद्धी योजनेत मुलींच्या भविष्यासाठी गुंतवणुकीचे आवाहन !!

Chief Editor

प्राचीन संस्कृतीचा जागर… गुहेत विराजमान विघ्नहर्ता ; समता गणेश मंडळाची कलात्मक निर्मिती ; राजुरीत गणेशोत्सवाला सामाजिक एकोपा अन् सांस्कृतिक परंपरेची जोड !!

Chief Editor

Leave a Comment