सामाजिक

उन्हाच्या झळा झाल्या तीव्र; आठवडे बाजारात ग्राहकांचा शुकशुकाट !!

motion photo 306413607639533628
motion photo 5911427153813666368

पंचनामा प्रतिनिधी – लोणी ( ता.आंबेगाव ) येथील बुधवारच्या आठवडे बाजारात वाढत्या उष्णतेमुळे ग्राहकांचा शुकशुकाट होता.येथील आठवडे बाजारात येणार्या लहान मोठ्या व्यापार्यांना अक्षराशा ग्राहकांची वाट पहात बसावे लागल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

सध्या आंबेगाव तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढत असून पारा ४० अंशाच्या उंबरठ्यावर पोहोचला. आंबेगावच्या तालुक्याच्या पूर्व भागातील लोणी येथील आठवडे बाजार सर्वात मोठा बाजार असून आंबेगाव, खेड, शिरूर तालुक्यातील जवळ-जवळ ३५ ते ४० गावांचा संपर्क या बाजाराशी असतो. पण सध्या वाढत्या उष्णतेमुळे ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरवल्याने बाजारात ग्राहकांची फारच वर्दळ कमी होती.

सध्या या भागात कमाल तापमान ३५ ते ४० अंश सेल्सिअस पर्यंत पोहचले आहे.उन्हाची दाहकता वाढल्याने जीवाची घालमेलही वाढली आहे.

जिल्ह्यात यावर्षी हिवाळ्यात थंडी अधिक प्रमाणात जाणवलीच नाही.पण उन्हाळ्याला लवकर सुरूवात झाली.कारण फेब्रुवारीतच जिल्ह्यातील कमाल तापमान ३५ अंशावर गेले होते.तर मार्च महिना सुरू झाल्यानंतर उन्हाची तीव्रता आणखी वाढली.

fb img 1774661444136

मागील काही दिवसांत तर दुपारच्या सुमारास उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत.अशातच पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कमाल तापमानात वाढ होताना दिसुन येत आहे.

यामुळे दिवसभर उन्हाच्या झळा सोसण्याची वेळ लोकांवर आली आहे. त्यामुळे ग्राहकांनी बाजारात येण्याऐवजी घरात बसणे पसंत केले.त्याचबरोबर उन्हाची तीव्रता वाढल्याने ग्रामीण भागातील रस्तेही ओस पडू लागलेत. त्यामुळे आठवडे बाजारातही शीतपेयांना मागणी वाढलेली आहे.

motion photo 306413607639533628

लोणी (ता.आंबेगाव ) येथील आठवडे बाजारात उष्णतेमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ

img 20260430 wa0663

Related posts

असे तमाशाफड,असे तमाशा व्यवस्थापक – मा.राजेंद्र छगन काशीद

Chief Editor

हरिनामाच्या गजरात शिंगवे गाव दुमदुमले,आनंदवारी दिंडीने जपली वारकरी परंपरा !!

Chief Editor

नागपुरातील कौशल्य विकास विद्यापीठासाठी जागेचा निर्णय महिनाभरात -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Chief Editor

Leave a Comment