सामाजिक

मांदळेवाडी (ता.आंबेगाव ) येथील पक्षीप्रेमी प्रदिप आदक यांनी पक्ष्यांसाठी बसवले बर्ड फूड फिडर !!

img 20260501 wa0420(1)

पंचनामा प्रतिनिधी – मांदळेवाडी ( ता.आंबेगाव ) हे दुष्काळग्रस्त गाव..दरवर्षी तीन चार महिने येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असतो. माणसे कसेही पाणी उपलब्ध करतात पण पशूपक्षांचे काय ? हि समस्या लक्षात घेऊन येथील पक्षीप्रेमी प्रदिप आदक यांनी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पक्षांना पाणी पिण्यासाठी आणि खाण्यासाडी आपल्या घरासमोरल बागेत” बर्ड फूड फिडर ” बसविले आहे.

यावर्षी तापमान ४० तो ४५ डिग्री पर्यंत गेले आहे.पक्षी वाचवण्यासाठी आणि निसर्ग संगोपन करण्यासाठी आता पुढे यावे लागेल. नाहीतर येणाऱ्या काळात तापमान हे ५०,५५ डिग्री वर जायला वेळ लागणार नाही.त्यामुळे जास्तीत जास्त झाडे लावायची गरज आहे.

img 20260501 wa0421(1)

प्रदिपने त्याच्या घराभोवती आंबा,फणस,केळी, चिकू,नारळ,पेरू,अंजीर अशी बरीच झाडे लावली आहेत.सावली आणि फळे खाण्यासाठी मोठ्या प्रमाणात पक्षी येतात. चिमणी, साळुंकी, कावळे पोपट असे बरेच पक्षी येतं असतात

निसर्ग आपल्याला खूप काही मोफत देतो. आपण पण निसर्गाचे काही तरी देणे लागतो. जुन्नर येथील निसर्ग प्रेमी रमेश खरमाळे यांचा आदर्श घेऊन येणाऱ्या पुढील काळात पण अजून झाडे लावण्याचा प्रयत्न करेल आणि पशू पक्षी संगोपन करण्यासाठी प्रयत्न करेल. आपण पण सर्वांनी पण पक्ष्यांनसाठी पाण्याची आणि खाण्याची अशाप्रकारे सोय करावी असे आवाहन प्रदिपन केले आहे.

img 20260501 wa0420(1)

मांदळेवाडी (ता.आंबेगाव ) येथे प्रदिप आदक यांने पक्षांना खाण्यासाठी बसवलेली ” बर्ड फूड फिडर ”

img 20260430 wa0662

Related posts

जारकरवाडी येथे श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांना फराळ वाटप ; धार्मिक परंपरा, पांडवकालीन इतिहास आणि निसर्गसौंदर्याने नटलेले गाव !!

Chief Editor

समर्थ आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये आचार्य सुश्रुत जयंती व महाकवी कालिदास दिन उत्साहात साजरा !!

Chief Editor

समर्थच्या विद्यार्थ्यांची MHT-CET (PCB) परीक्षेत यशाची सुवर्णझेप !!

Chief Editor

Leave a Comment