सामाजिक

धामणी (लोणी) येथे ब्रिटायनिया इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या वतीने आरोग्य तपासणी शिबीर संपन्न !!

img 20260331 wa0425

पंचनामा प्रतिनिधी – धामणी (ता.आंबेगाव) येथे ब्रिटानिया इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या सीएसआर उपक्रम अंतर्गत सर नेस वाडिया फाउंडेशन व शिवशंकर डेअरी धामणी,ग्रामपंचायत धामणी यांच्या सहकार्याने आरोग्य शिबीर संपन्न झाले.या शिबिरात धामणी,शिरदाळे,पहाडदरा गावातील वृद्ध तसेच अनेक रुग्णांनी लाभ घेतला.यात प्राथमिक तपासणी,दंत तपासणी,डोळे तपासणी,बीपी तपासणी,हिमोग्लोबिन तपासणी आणि मोफत औषध वाटप करण्यात आले.

सरनेस वाडीया फाउंडेशन यांच्या माध्यमातून मॅनेजर श्री.केदार अन्नम,श्री.प्रणव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या टीम ने संपूर्ण तपासणी शिबीर संपन्न केले.लहान मुले, गर्भवती महिला , किशोरवयीन मुली आणि सर्व पुरुष यांच्यासाठी मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रतीक जाधव,संदीप बोऱ्हाडे,देविदास करंजखेले,आशिष गाढवे,पांडूशेठ जाधव,भाऊसाहेब करंडे,अक्षय रोडे हे मंडळी उपस्थित होते.

fb img 1773887068819

Related posts

लोककलावंतांचा वारंवार होणारा अपमान थांबला पाहिजे;पद्मश्री रघुवीर खेडकर यांच्या नाराजी मागील वेदना समजून घेण्याची गरज !!

Chief Editor

राज्यात साखर उत्पादन १० लाख टनांनी घटणार; उत्पादन १०० लाख टनांवर स्थिरावण्याची शक्यता !!

Chief Editor

खड्ड्यांतूनच दत्तदर्शन! सौरंगा दत्तमंदिराच्या रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; भाविकांचा संताप !!

Chief Editor

Leave a Comment