सामाजिक

धामणीत संत सावता माळी महाराज मंदिरात काकडा आरती सोहळ्याची भक्तिमय वातावरणात सांगता ; भाविकांना मिठाई व स्वेटरचे वाटप !!

img 20261124 wa0929

पंचनामा प्रतिनिधी – धामणी : धामणी येथील संत सावता माळी महाराज मंदिरात आश्विन ते कार्तिक पौर्णिमा या महिनाभराच्या कालावधीत भक्तिमय वातावरणात सुरू असलेल्या काकडा आरती सोहळ्याची आज उत्साहात सांगता करण्यात आली. महिनाभर दररोज पहाटे पाचच्या सुमारास टाळ-मृदुंगाच्या निनादात आणि हरिनामाच्या गजरात परिसर भक्तिमय होऊन जात होता. या सोहळ्याला वृद्ध महिला-पुरुषांसह तरुण भाविकांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

पहाटेच्या प्रसन्न वातावरणात होणारी काकड आरती, हरिनामाचा गजर आणि टाळ-मृदुंगाच्या साथीने मंदिर परिसरात अवघे वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघत होते. महिनाभर अखंड सुरू असलेल्या या धार्मिक उपक्रमामुळे गावात आध्यात्मिक आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

1011804804

कार्तिक स्नान सोहळ्याचा समारोप सावतामाळी मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर विधाटे, ज्ञानज्योती शिक्षण व आरोग्य संस्थेच्या अध्यक्षा सुनीता ज्ञानेश्वर विधाटे, उपाध्यक्ष प्रदीप भुमकर, संदीप भुमकर, सचिव अंकुश भूमकर आणि उपसरपंच अक्षय विधाटे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महिनाभर काकडा आरतीसाठी नियमित उपस्थित राहिलेल्या ६५ भाविकांना मिठाई व स्वेटरचे वाटप करण्यात आले.

सायंकाळी मंदिरासमोर तुळशी विवाह सोहळा उत्साहात संपन्न झाला. त्यानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. धार्मिक परंपरेचे जतन करण्याबरोबरच सामूहिक भक्ती, सामाजिक एकोपा आणि सेवाभावाचा संदेश या सोहळ्याच्या माध्यमातून देण्यात आला.

1011804817

याप्रसंगी बाळु महा भुमकर (गुरुजी ), गणपत हरी विधाटे, बळवंत विधाटे, सोपान विधाटे, बबन विधाटे, गुंडा भुमकर, पोपट गवंडी, काळुराम विधाटे, राजाराम विधाटे, सिताराम भुमकर, श्रीराम विधाटे, कैलास भुमकर, गौरव विधाटे, चिंतामण विधाटे, किशोर विधाटे, मुरलीधर देखणे, पुरोहित बाळू बेरी, प्रभाकर भगत, ओम आळेकर, हर्षद विधाटे, समर्थ विधाटे, उज्वला भुमकर, सुनंदा गवंडी, नीता भुमकर, पुष्पा विधाटे, बेबी अमाप, स्वराली आळेकर, चित्रा भूमकर, विठाबाई भुमकर, जनाबाई विधाटे, जिजाबाई भूमकर आदी भाविक उपस्थित होते.

1011785549
1011785601

Related posts

जारकरवाडीच्या तरुणांनी जपली आषाढी बारशीच्या अन्नप्रसादाची अनोखी परंपरा !!

Chief Editor

अवकाळीने हिरावला बळीराजाच्या तोंडचा घास;लाखणगावात तीन एकर कलिंगडाची बाग उध्वस्त !!

Chief Editor

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गवारीमळा (मेंगडेवाडी) येथे उत्साहात संपन्न झाला मातृ पितृ पूजन दिवस!!

Chief Editor

Leave a Comment