सामाजिक

अवसरी फाटा–जांबूत रस्त्याचे काम रखडले ; धुळीच्या लोटाने ग्रामस्थ हैराण !!

img 20261124 wa0826

दोन वर्षांपासून काम संथगतीने सुरू; खड्डे, उखडलेली खडी आणि धुळीमुळे वाहनचालकांसह नागरिकांना नाहक त्रास

पंचनामा प्रतिनिधी – अवसरी फाटा–निरगुडसर (ता.आंबेगाव) ते जांबूत (ता. शिरूर) या महत्त्वाच्या रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून संथगतीने सुरू असल्याने परिसरातील ग्रामस्थ, वाहनचालक आणि प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावरील खड्डे, उखडलेली खडी आणि वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे उडणारी धूळ यामुळे हा प्रवास अक्षरशः त्रासदायक बनला आहे.

या रस्त्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू असून, अनेक ठिकाणचे खड्डे अद्याप बुजविण्यात आलेले नाहीत. दिवाळीपूर्वी अवसरी फाटा ते निसर्ग मंगल कार्यालय परिसरातील खड्डे बुजविण्यात आले होते. मात्र, अवघ्या दोन ते चार दिवसांत काही ठिकाणी पुन्हा खड्डे पडल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

रस्त्यावर पसरलेल्या खडीमुळे वाहनांचे नुकसान होत असून, वाहने घसरून किरकोळ अपघातही घडत आहेत. त्यातच वाहनांच्या वर्दळीमुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत असल्याने दुचाकीस्वार, पादचारी तसेच रस्त्यालगत राहणाऱ्या नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. धुळीमुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावरही परिणाम होत आहे.

कामाचा दर्जा आणि गतीकडे लक्ष देण्याची गरज

रस्त्याचे काम काही ठिकाणी पूर्ण करा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. मात्र, अद्यापही धुळीचा बंदोबस्त झालेला नाही. संबंधित ठेकेदाराने कामाला गती देऊन दर्जेदार पद्धतीने रस्त्याचे काम पूर्ण करावे. तसेच काम पूर्ण होईपर्यंत नियमित पाणी मारून धुळीचा त्रास कमी करावा, अशी अपेक्षा वाहनचालकांनी व्यक्त केली आहे.

प्रशासनाच्या हस्तक्षेपाची मागणी

विशेष म्हणजे, या गंभीर समस्येकडे कोणत्याही राजकीय पक्षाचे लक्ष जात नसल्याची नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण आणि निर्धारित वेळेत पूर्ण करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

1011785549
1011785601

Related posts

कै.कस्तुराबाई जाधव यांच्या निधनाने महाराष्ट्रातील कलाविश्वात शोककळा ; दीपक शेठ जाधव यांच्या मातोश्रींचे निधन ; फडमालक, कलावंत आणि रसिकांकडून भावपूर्ण श्रद्धांजली

Chief Editor

चांडोली बुद्रुक येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात !!

Chief Editor

कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे शेतकऱ्यांची अभ्यास सहल संपन्न !!

Chief Editor

Leave a Comment