सामाजिक

चांडोली बुद्रुक येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात !!

1011175612

नवोपक्रम, ‘निपुण पुणे’, हॅकेथॉन अन् इन्स्पायर मानक अवॉर्डवर शिक्षकांचे मंथन !!

पंचनामा प्रतिनिधी चांडोली बुद्रुक – विद्यार्थ्यांमध्ये विचारक्षमता, सर्जनशीलता, भाषिक कौशल्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी अध्यापनात नावीन्यपूर्ण प्रयोगांची गरज आहे. या उद्देशाने शिक्षकांच्या अध्यापन कौशल्याला नवे आयाम देणारी तिसरी केंद्रस्तरीय शिक्षण परिषद चांडोली बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक केंद्रशाळेत उत्साहात पार पडली.

जिल्हा परिषद पुणे आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित परिषदेत केंद्रांतर्गत असलेल्या १५ शाळांतील प्राथमिक शिक्षकांनी सहभाग घेतला. नवोपक्रम, भाषा अध्ययन निष्पत्ती, ‘निपुण पुणे’, हॅकेथॉन स्पर्धा, इन्स्पायर मानक अवॉर्ड तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक विविध शैक्षणिक बाबींवर यावेळी सखोल चर्चा करण्यात आली.

प्राथमिक शिक्षणाधिकारी ललिता दहितुले, गटशिक्षणाधिकारी रुपाली धोका आणि शिक्षणविस्तार अधिकारी शैला निमसे यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेचे आयोजन करण्यात आले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. चांडोली बुद्रुक शाळेतील विद्यार्थिनींनी सादर केलेल्या ईशस्तवनाने कार्यक्रमाला प्रसन्न वातावरण लाभले.

परिषदेचे वैशिष्ट्य म्हणजे शिक्षकांना केवळ व्याख्यानातून मार्गदर्शन न करता प्रत्यक्ष कृतीत सहभागी करून घेण्यात आले. शिक्षकांचे विविध गट तयार करून विषयानुरूप चर्चा, गटकार्य आणि सादरीकरण घेण्यात आले. त्यामुळे परिषद ही अनुभवांची देवाणघेवाण, चिंतन आणि कृतीचे प्रभावी व्यासपीठ ठरली.

तज्ज्ञ मार्गदर्शक रोहिदास सोनवणे यांनी भाषा अध्ययन निष्पत्ती, नवोपक्रम स्पर्धा आणि ‘निपुण पुणे’ या उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रगतीचे प्रभावी मूल्यमापन करण्याबाबत मार्गदर्शन केले. तुषार शिंदे यांनी छोटा प्रसंगलेखन, हॅकेथॉन स्पर्धा आणि इन्स्पायर मानक अवॉर्ड याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देण्यासाठी अध्यापनात नावीन्यपूर्ण पद्धतींचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.

गुणवंत शिक्षकांचा गौरव

आंबेगाव तालुक्यात केंद्रप्रमुखपदी स्पर्धा परीक्षेतून नव्याने नियुक्त झाल्याबद्दल राहुल रहाटाडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच पुणे जिल्हा परिषदेचा जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल दीपा गोरडे आणि संदीप शिंदे यांचा शाल व गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला.

केंद्रप्रमुख सीमा कहडणे आणि केंद्रप्रमुख राहुल रहाटाडे यांनी मराठी अभिजात भाषा दिवस, महात्मा फुले द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त आयोजित विविध कार्यक्रम तसेच प्रशासकीय बाबींविषयी शिक्षकांना मार्गदर्शन केले.

यावेळी मुख्याध्यापक हेमराज भदाणे, आंबेगाव शिक्षक पतसंस्थेचे सभापती कान्होबा डोंगरे, प्राथमिक शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष विजय डोके, दीपाली अजाब, मीना निऱ्हाळी, कृष्णराव हुले, मंगलादेवी पवार, सतीश वाव्हळ, रवींद्र थोरात, दत्ता गोरडे, विजय थोरात, भानुदास बटवाल, सुधीर चिखले, निलम आल्हाट, सुनीता खेबडे, नामदेव तळपे, विशेष शिक्षिका स्वाती पडवळ यांच्यासह केंद्रातील शिक्षक उपस्थित होते.

परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी अनिल लोंढे, शैला खेडकर, संगिता वाव्हळ, मनिषा कानडे, उर्मिला पाटील, दीपा गोरडे आणि सोनाली पालेकर यांनी नियोजन केले. प्रास्ताविक मुख्याध्यापिका दीपाली अजाब यांनी केले. विज्ञान पदवीधर शिक्षक विकास कानडे यांनी सूत्रसंचालन केले, तर राज्य आदर्श पुरस्कारप्राप्त शिक्षक बाळासाहेब कानडे यांनी आभार मानले.

1011175611

फोटो ओळ : चांडोली बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेत सहभागी शिक्षकवृंद.

Related posts

धामणी येथे वैरण विकास योजनेअंतर्गत मका वाटप !!

Chief Editor

समर्थ आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये आचार्य सुश्रुत जयंती व महाकवी कालिदास दिन उत्साहात साजरा !!

Chief Editor

धामणी (लोणी) येथे संपन्न झाले दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबिर !!

Chief Editor

Leave a Comment