सामाजिक

कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे शेतकऱ्यांची अभ्यास सहल संपन्न !!

img 20260329 wa0595
img 20260329 wa0593

पंचनामा प्रतिनिधी – कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे संस्थेमार्फत शेतकऱ्यांची अभ्यास सहल आयोजित करण्यात आली होती. या सहलीमध्ये मिडगुलवाडी, कोंढापुरी व केंदूर येथील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या सहलीचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना आधुनिक व तंत्रज्ञानाधारित शेती पद्धतींबाबत मार्गदर्शन करणे हा होता. विशेषतः AI आधारित शेती (Artificial Intelligence in Agriculture) या विषयावर तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

img 20260329 wa0599

कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पीक व्यवस्थापन, रोग व कीड नियंत्रण, हवामान अंदाज, माती परीक्षण, सिंचन व्यवस्थापन यामध्ये कशी अचूकता व उत्पादनवाढ साध्य करता येते याविषयी माहिती देण्यात आली.

तसेच ड्रोन तंत्रज्ञान, सेन्सर आधारित सिंचन प्रणाली, डिजिटल माती परीक्षण व मोबाईल अॅपद्वारे पीक सल्ला याबाबत प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध शंकांचे निरसन करून घेतले.

img 20260329 wa0591

या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची ओळख झाली असून भविष्यात उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढविण्यास मदत होणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे पदाधिकारी व कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांचे आभार मानण्यात आले.

fb img 1773887068819

Related posts

जिद्द,कष्ट आणि यशाचा सुवर्णमहोत्सव; निरगुडसरच्या डॉ.शितल शिंदेची राज्यात दुसरी क्रमांकाची झेप !!

Chief Editor

समर्थ गुरुकुलमध्ये सीबीएसई दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण – गौरव सोहळा उत्साहात संपन्न;जीवनातील प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्टतेचा ध्यास, सातत्यपूर्ण परिश्रम आणि शिस्त यांच्या बळावरच यश संपादन करता येते.– सौ.अन्नपूर्णा राव

Chief Editor

समर्थ मध्ये सायबर गुन्हे व सुरक्षा या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन ;डिजिटल अरेस्ट म्हणजे सायबर फसवणूक- एच.डी.एफ.सी बँकचे क्लस्टर हेड रोहित तेंडुलकर यांचे प्रतिपादन

Chief Editor

Leave a Comment