सामाजिक

पारगावमध्ये ‘माणुसकीची भिंत’ उभारणीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी!

img 20260329 wa0415
a350b442260a4e288bb0f46eeed167f0

पंचनामा प्रतिनिधी – पारगाव (ता.आंबेगाव) येथे ग्रामपंचायत हद्दीत ‘माणुसकीची भिंत’ उपक्रम सुरू करण्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यात यावी,अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य व माजी उपसरपंच विठ्ठल सिताराम ढोबळे यांनी सरपंच श्वेता ढोबळे व के.डी.भोजणे ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे लेखी अर्जाद्वारे केली आहे.

माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे यांनी आपल्या अर्जात नमूद केले आहे की,गावातील नागरिकांकडे वापरात नसलेले पण चांगल्या स्थितीत असलेले पुरुष, स्त्रिया आणि मुलांचे कपडे या भिंतीवर ठेवता येतील.त्यामुळे गावातील तसेच परिसरातील गरीब व गरजू कुटुंबांना मोठी मदत मिळणार आहे.अनेक गावांमध्ये हा उपक्रम यशस्वी ठरला असून,पारगावमध्ये तो राबवल्यास पंचक्रोशीतील इतर ग्रामपंचायतींसाठीही आदर्श निर्माण होईल,असेही त्यांनी नमूद केले आहे.

‘माणुसकीची भिंत’ नावाने भिंत उभारून गरजूंसाठी विनामूल्य कपडे उपलब्ध करणे हा उपक्रम सामाजिक ऐक्य वृद्धिंगत करणारा असून, ग्रामपंचायतीमार्फत हा उपक्रम राबविण्यात यावा,अशा आशयाचे आवाहनही त्यांनी ग्रामस्थांना केले आहे.

अर्जावर पुढील कार्यवाही करून गावात योग्य ठिकाणी ही भिंत उभारावी,अशी मागणी माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे यांनी आपल्या अर्जात केली आहे.

fb img 1773887068819

Related posts

पारगाव (शिंगवे) येथील पुलावर अपघाताचा धोका;घोड नदीवरील पुलाच्या दोन्ही बाजूंना आवश्यक सूचना फलक बसवा – मा. उपसरपंच विठ्ठल ढोबळे यांची मागणी!!

Chief Editor

कांदा उत्पादकांच्या प्रश्नांवर केंद्र व राज्य सरकार सकारात्मक; आंदोलकांनी सकारात्मक चर्चेसाठी पुढे यावे- मा.मंत्री दिलीप वळसे पाटील

Chief Editor

भिर्रर्र…. भिर्रर्र….झाली…. उचल की टाक…. सेकंद…. अशा भारदस्त पहाडी आवाजात संपन्न झाली वडगावपीर येथील पिरसाहेब यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यत!!

Chief Editor

Leave a Comment