सामाजिक

समर्थ शैक्षणिक संकुलात ‘PHARMA AI-NOVA 2026’ राष्ट्रीय परिषद उत्साहात !!

1011369466
1011369466

कृत्रिम बुद्धिमत्ता, आधुनिक औषधनिर्मिती व संशोधनावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन; ३२५ विद्यार्थ्यांचा सहभाग

पंचनामा प्रतिनिधी – समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी व समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी, बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन, लोकल ब्रँच आळेफाटा आणि नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशन, पुणे यांच्या सहकार्याने आयोजित ‘PHARMA AI-NOVA 2026: Through Emerging Technologies’ या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचा शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर रोजी उत्साहात प्रारंभ झाला. या परिषदेत डी. फार्मसी, बी. फार्मसी, एम. फार्मसीचे विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापक अशा सुमारे ३२५ हून अधिक जणांनी सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व फार्मसी क्षेत्राचे जनक डॉ. एम. एल. श्रॉफ यांच्या प्रतिमापूजनाने झाली. यावेळी संस्थेचे सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सचिन कोतवाल, इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशनच्या आळेफाटा स्थानिक शाखेचे अध्यक्ष डॉ. डी. डी. गायकवाड आणि डॉ. सुरेश जाधव उपस्थित होते. विश्वस्त वल्लभ शेळके यांनी विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून संशोधनवृत्ती विकसित करावी आणि फार्मसी क्षेत्राच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहन केले.

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक फार्मसीवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन
परिषदेच्या पहिल्या दिवशी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज, मुंबईचे डॉ. मयूर संगवाई यांनी ‘From Molecule to Patient: AI, Innovation and the Future of Pharma’ या विषयावर मार्गदर्शन केले. औषध संशोधनापासून रुग्णांपर्यंत औषध पोहोचविण्याच्या प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.
भारती विद्यापीठाच्या पूना कॉलेज ऑफ फार्मसीचे डॉ. एल. सथियानारायणन यांनी ‘Role of AI in Pharmaceutical Education and Research’ या विषयातून फार्मसी शिक्षण आणि संशोधनातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उपयोगावर प्रकाश टाकला. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे डॉ. सतीश पोलशेट्टीवार यांनी ‘Pharma 4.0 with AI: Reimagining the Future of Pharmaceutical Sciences’ या विषयावर मार्गदर्शन करताना डिजिटल तंत्रज्ञानामुळे औषधनिर्मिती व संशोधन क्षेत्रात निर्माण होणाऱ्या नव्या संधी विशद केल्या.
डॉ. उमेश बनकर यांनी बौद्धिक संपदा हक्कांचे महत्त्व, संशोधनातील नवकल्पनांचे संरक्षण आणि फार्मसी क्षेत्रातील त्यांचा उपयोग याविषयी माहिती दिली. डॉ. व्ही. के. मौर्य यांनी औषधनिर्मितीतील आधुनिक फॉर्म्युलेशन पद्धती, नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि औषधांची गुणवत्ता व परिणामकारकता वाढविण्यासाठी संशोधनाची भूमिका स्पष्ट केली. डॉ. पंकज दीक्षित यांनी ‘Modern Medicine and Monoclonal Antibodies: Magic Bullet Indeed’ या विषयावर मार्गदर्शन करताना मोनोक्लोनल अँटीबॉडीज, लक्ष्यित उपचारपद्धती आणि विविध आजारांच्या उपचारांमधील त्यांचे महत्त्व अधोरेखित केले.
पोस्टर सादरीकरण स्पर्धेत विद्यार्थ्यांचे यश
राष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने आयोजित पोस्टर सादरीकरण स्पर्धेत डी. फार्मसी, बी. फार्मसी, एम. फार्मसी आणि पीएच.डी. गटातील विद्यार्थ्यांनी व संशोधकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिक, ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
डी. फार्मसी गट : प्रथम क्रमांक समृद्धी जाधव व नम्रता खंडारे (जे.बी.व्ही.पी. विद्यानिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी, लाखेवाडी) यांनी मिळविला. द्वितीय क्रमांक अंकिता तोडकर व गायत्री मवाळे (समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी, बेल्हे) यांनी, तर उत्तेजनार्थ पारितोषिक रिंकू चौधरी व श्रावणी पवार (आर.जे.एस.पी.एम. कॉलेज ऑफ फार्मसी, आळंदी) यांनी मिळविले.

बी. फार्मसी गट : ओम जगदळे व अश्विनी भोर (समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी, बेल्हे) यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. भुशारा अस्लम मनियार व श्रद्धा विजय वाळके (लोकनेते अप्पासाहेब राजळे कॉलेज ऑफ फार्मसी, आदिनाथनगर) यांनी द्वितीय क्रमांक, तर वैष्णवी मोरे व तृप्ती चौधरी (समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बेल्हे) यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले.
एम. फार्मसी गट : अतुल घोगरे (मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे) यांनी प्रथम क्रमांक मिळविला, तर नीलम इचके (समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बेल्हे) यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला.
पीएच.डी. गट : हेमंत व्ही. ढाकणे (के. एम. कुंदनानी कॉलेज ऑफ फार्मसी, मुंबई) यांनी प्रथम क्रमांक मिळविला.

प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांना पाच हजार रुपये, ट्रॉफी व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यांना तीन हजार रुपये, ट्रॉफी व प्रमाणपत्र, तर उत्तेजनार्थ विजेत्यांना दोन हजार रुपये, ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या नव्या संधींची ओळख
या राष्ट्रीय परिषदेमुळे फार्मसी शिक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, आधुनिक औषधनिर्मिती आणि संशोधन यांचा संगम साधला जात असून विद्यार्थ्यांना भविष्यातील तंत्रज्ञानाधारित संधींची ओळख होत आहे, असे समर्थ शैक्षणिक संकुलाचे कॅम्पस डायरेक्टर प्रा. राजीव सावंत यांनी सांगितले. तज्ज्ञांची व्याख्याने, संशोधनविषयक चर्चा आणि पोस्टर सादरीकरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञानाची देवाणघेवाण करण्याची तसेच आपल्या संशोधनाला व्यासपीठ मिळविण्याची संधी उपलब्ध झाली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्राची पडवळ यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत डॉ. मंगेश होले, डॉ. बिपिन गांधी, डॉ. सचिन दातखिळे, डॉ. राहुल लोखंडे, डॉ. शीतल गायकवाड, प्रा. नितीन महाले, प्रा. अजय भागवत आणि प्रा. अक्षय फुलसुंदर यांनी केले. समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. कुलदीप रामटेके यांनी प्रास्ताविक केले, तर समर्थ कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. संतोष घुले यांनी आभार मानले.

img 20261016 wa1042

Related posts

समर्थच्या खेळाडूंची बॉक्सिंग, बुद्धिबळ व कराटे स्पर्धेत दमदार कामगिरी !!

Chief Editor

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जयंती नेहरू विद्यालयात वृक्षारोपन करून साजरी !!

Chief Editor

पाबळ येथे सोयाबीन पीक पद्धतीवर प्रशिक्षण

Chief Editor

Leave a Comment