सामाजिक

शिंगवे येथे कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन ; तोंडाचा, स्तनाचा व गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरची तपासणी

1011357005

पंचनामा प्रतिनिधी – समीर गोरडे

शिंगवे (ता.आंबेगाव) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी कॅन्सर तपासणी व्हॅनच्या माध्यमातून तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत झालेल्या या शिबिरात तोंडाचा कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर तसेच गर्भाशयाच्या मुखाचा (सर्व्हायकल) कॅन्सर यांची तपासणी करण्यात आली.

1011357013

कॅन्सरचे लवकर निदान होऊन रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील नागरिकांना कॅन्सर तपासणीची सुविधा उपलब्ध व्हावी आणि आरोग्याबाबत जनजागृती व्हावी, हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू होता.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हकारे व तालुका आरोग्य अधिकारी तुषार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी डॉ. सुहास मैड, डॉ. उमेश सहाने, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रीती डामसे, मुख शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत सोनुने, डॉ. शेषराव मुरकुटे, प्रेमांकिता शिंदे तसेच सर्व आशा सेविका उपस्थित होत्या.

1011357007

या शिबिराला पंचायत समिती सदस्य श्वेता ढोबळे, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक नितीन वाव्हळ, पोलीस पाटील गणेश पंडित, उपसरपंच हिरामण गोरडे, पारगाव ग्रामपंचायत सदस्य रोहिणी देवडे, सोसायटी संचालक प्रकाश वाव्हळ आदी मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली.

कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचे वेळीच निदान झाल्यास उपचारांना मदत होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी आरोग्य तपासणीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे या उपक्रमातून अधोरेखित करण्यात आले.

img 20261016 wa1042
1011291568

Related posts

गुरुकुलचा समर्थ शेळके बारावी सी.बी.एसई.बोर्डामध्ये जुन्नर-आंबेगाव तालुक्यातून प्रथम !!

Chief Editor

१९६८/६९बॅचचे माजी विद्यार्थी सत्तावन्न वर्षानी भेटले एकत्र !!

Chief Editor

शेतकऱ्यांची ४८ हजार कोटी रुपयांची वीज बिल थकबाकी माफ करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Chief Editor

Leave a Comment