सामाजिक

निरगुडसर विद्यालयाच्या १४ वर्षांखालील क्रिकेट संघाचा तालुक्यात प्रथम क्रमांक ; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघाची निवड !!

1010921205

पंचनामा प्रतिनिधी निरगुडसर – महाराष्ट्र शासन, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या वतीने लांडेवाडी येथील क्रीडा स्कूलमध्ये आयोजित तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत निरगुडसर (ता. आंबेगाव) येथील पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालयाच्या १४ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट संघाने प्रथम क्रमांक मिळविला.

या उल्लेखनीय कामगिरीमुळे विद्यालयाच्या क्रिकेट संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. संघाने तालुकास्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद पटकावले. याबाबतची माहिती विद्यालयाचे प्राचार्य कांताराम टाव्हरे यांनी दिली. पर्यवेक्षक संतोष वळसे यांनी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघाची निवड झाल्याचे सांगितले.

विजयी खेळाडूंना क्रीडा शिक्षक भरत खिलारी तसेच विद्यालयातील इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

विजयी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष ॲड. प्रदीप वळसे पाटील, सचिव प्रकाश तापकीर, संचालक व प्राचार्य सुनील वळसे पाटील, सर्व संचालक, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ व पालकांनी अभिनंदन केले.

1010921205

निरगुडसर येथील विद्यालयाच्या विजयी १४ वर्षांखालील क्रिकेट संघासोबत शिक्षक.

1010891586
92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 379001

Related posts

अतिवृष्टीमुळे जुन्नर-आंबेगावमधील १३ रस्ते तात्पुरते वाहतुकीसाठी बंद !!नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचे आदेश; परिस्थितीनुसार रस्ते सुरू करण्याचा निर्णय घेणार तहसीलदार

Chief Editor

मराठी भाषा जतन आणि संवर्धनासाठी प्रभावी कृती आराखडा राबवा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Chief Editor

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना – २०२६’ अंतर्गत १६ लाख ९६ हजार पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर !!

Chief Editor

Leave a Comment