सामाजिक

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरदाळे यांना सेवा निवृत्त शिक्षक मा.मुख्याध्यापक श्री.दादाभाऊ झुंबरराव शेलार यांच्याकडून धनादेश सुपुर्द !!

img 20260316 wa0380

पंचनामा प्रतिनिधी – शिरदाळे (ता.आंबेगाव) येथील जिल्हा परिषद शाळेसाठी शाळेचे माजी शिक्षक श्री.दादाभाऊ शेलार गुरुजी यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरदाळे (पूर्वीचे जीवन शिक्षण मंदिर) या शाळेला रोख स्वरूपात देणगी दिली आहे.त्यांचा नुकताच सेवानिवृत्तीचा कार्यक्रम पार पडला.ज्या शाळेत आपण आपल्या कामाला सुरवात केली त्या शाळेप्रती आणि ग्रामस्थांच्या प्रती एक आठवण म्हणून रोख स्वरूपात देणगी देण्यात आली.

यावेळी शिरदाळे येथील त्यांचे माजी विद्यार्थी श्री.मनोज तांबे,श्री.गणेश तांबे,श्री.बिपीन चौधरी,श्री.जयदीप चौधरी ,श्री.संतोष तांबे तसेच त्यांचे सहकारी शिक्षक श्री.विठ्ठल तांबे गुरुजी हे त्या सेवानिवृत्त कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.यावेळी ही देणगी शेलार परिवाराच्या वतीने या माजी विद्यार्थ्यांकडे सुपूर्द करण्यात आली होती.

img 20260316 wa0380

आज ही देणगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री.राजेश ढोबळे सर व सहशिक्षिका सौ.ज्योती ढोबळे मॅडम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

यावेळी सर्व विद्यार्थ्यांसह सरपंच श्री.मनोज तांबे,मा.उपसरपंच मयूर सरडे,मा.उपसरपंच सुभाष तांबे,सोसायटी संचालक सुहास रणपिसे,सखाराम तांबे,संभाजी सरडे ,बाळू चौधरी,दिलीप तांबे,सचिन तांबे,विक्रम तांबे,अंगणवाडी सेविका शांताबाई चौधरी,जया रणपिसे,कांताबाई तांबे हे उपस्थित होते.

fb img 1771121541695

Related posts

पारगाव (शिंगवे) येथे संपन्न झाला एकल महिला दिन !!

Chief Editor

पंचनामा विशेष – अष्टपैलू तमाशा कलावंत राधाकृष्ण राहूरीकर !!

Chief Editor

पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात विशेष वाहतूक व्यवस्था; दर्शनासाठी १० ठिकाणी वाहनतळाची सुविधा !!

Chief Editor

Leave a Comment