सामाजिक

खडकवाडी (ता.आंबेगाव) येथील पांडूरंग महादू वाळूंज यांच्या शेतातील डिपी व विद्युत खांब त्वरीत हटवण्याची मागणी !!

img 20260316 wa0233
img 20260316 wa0234

पंचनामा प्रतिनिधी – खडकवाडी (ता.आंबेगाव ) येथील पांडूरंग महादू वाळूंज यांनी सुरक्षिततेच्या कारणामुळे व जमिनीत-शेतात असलेली विद्यूत डिपी व विद्यूत खांब हलविण्याची मागणी त्यांनी महावितरणकडे एका अर्जाद्वारे केली आहे.

पांडूरंग महादू वाळूंज हे खडकवाडी गावाच्या हद्दीत मुळूकवस्ती येथे रहात असून त्याच्या घराजवळ महावितरणची डिपी आहे व जवळच विद्यूत खांब आहे. विद्यूत डिपी व विद्यूत खांब हे वाळूंज यांच्या खाजगी जमिनीत-शेतात आहे.या ठिकाणी असणार्या विद्यूत खांबाच्या तारा खूपच खाली आल्याअसून या तारांमुळे त्यांच्या संपूर्ण कुटूंबाला गंभीर अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. शिवाय या तारांची जर पावसाळ्यात जोरदार वार्यां व वादाळामूळे शॉर्टसर्किट होण्याचा धोका असून त्यामुळे एखादी धोकादायक घटना घडू शकते.त्यामुळे सदरील जमिनीवरील-शेतातील विद्यूत डीपी व विद्यूत खांब हलविण्यात यावा.दोन विद्यूत खांबामधील लोंबकळणार्या विद्यूत तारा व्यवस्थित करण्यात याव्यात.तसेच जमिनीचा-शेताचा काही भाग महावितरण कंपनीने वापरल्यामुळे सरकारी नियमा नुसार भाडे भरपाई देण्यात यावी अशी मागणी त्यांनी अर्जाने महावितरणकडे केली आहे.

अर्ज करून साडेचार ते पाच महिने झाले तरी महावितरण कंपनीने अजून कुठलीच कार्यवाही केली नाही. जर महावितरण कंपनीने येत्या पंधरा दिवसात योग्य निर्णय घेतला नाही तर मी व माझे कुटूंब लोणी येथील महावितरण कार्यालया समोर उपोषणास बसणारा असा इशारा वाळूंज यांनी दिली आहे.

या संदर्भात लोणी येथील महावितरणचे कनिष्ठ अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता वरिष्ठांशी बोलून योग्य तो निर्णय घेतला जाईल असे त्यांनी सांगितले.

img 20260316 wa0234

खडकवाडी (ता.आंबेगाव ) येथील पांडूरंग वाळूंज यांच्या शेतात असलेली विद्यूत डिपी व विद्यूत खांब.

fb img 1771121541695

Related posts

आंबेगाव तालुक्यातील लाखणगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार !!

Chief Editor

टी.व्ही.एस कंपनीच्या वतीने खडकवाडी येथे ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा !!

Chief Editor

कृषिरत्न डॉ.पंजाबराव देशमुख प्रेरणा पुरस्काराने लोणी (ता.आंबेगाव) येथील ज्येष्ठ शेतिनिष्ठ शेतकरी गनिभाई हुसेन सय्यद सन्मानित!!

Chief Editor

Leave a Comment