सामाजिक

आंबेगाव तालुका केंद्रप्रमुख संघटनेच्या अध्यक्षपदी एम.एड.कृती समितीचे राज्याध्यक्ष राजू सावकार जाधव यांची तर ,सरचिटणीसपदी सुनील कुऱ्हाडे,कार्याध्यक्षपदी राहुल रहाटाडे यांची बिनविरोध निवड !!

1009969896
1009969894

पंचनामा प्रतिनिधी -समीर गोरडे

घोडेगाव पंचायत समिती सभागृहामध्ये पार पडलेल्या सर्व केंद्रप्रमुखांच्या सहविचार सभेमध्ये केंद्रमुख संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी महाराष्ट्र राज्य एम.एड.कृती समितीचे राज्य अध्यक्ष राजू जाधव, उपाध्यक्षपदी मच्छिंद्र काळे, सीमा कहडणे, सरचिटणीसपदी सुनील कुऱ्हाडे, सह चिटणीसपदी पंकजा हगवणे,कार्याध्यक्षपदी राहुल राहाटाडे,सल्लागारपदी साहेबराव अहिरे,निळकंठ कोरडे,कोषाध्यक्षपदी सुरेश रोगटे,सहकोषाध्यक्षपदी स्मिता चासकर,संपर्कप्रमुख दत्तात्रय जासूद, सहसंपर्कप्रमुख योगिता बुट्टे,प्रसिद्धीप्रमुख दिनेश तुळे,जिल्हा प्रतिनिधी अंकुश बडे यांची बिनविरोध निवड झाली.

नुकतीच महाराष्ट्र राज्यामध्ये सरळ सेवानिवडीने सर्व जिल्ह्यांमध्ये एकाचवेळी परीक्षा घेऊन सरळसेवेने गुणानुक्रमाने प्रत्येक पंचायत समितीमध्ये एकूण मान्य केंद्रसंख्येच्या 50 टक्के पदे भरली गेली.आंबेगाव तालुक्यामध्ये एकूण 23 केंद्रे असून निम्मी पदोन्नतीने व निम्मी सरळसेवेने भरली गेली.ज्येष्ठ केंद्रप्रमुख साहेबराव अहिरे यांचे अध्यक्षतेखाली एकत्रित सर्वांची घोडेगाव पंचायत समिती सभागृहामध्ये सहविचार सभा संप्पन्न झाली.

सर्व केंद्रप्रमुखांची एकत्रित चर्चा होऊन सर्वानुमते अध्यक्ष,उपाध्यक्ष,सेक्रेटरी,सल्लागार,जिल्हा प्रतिनिधी संपर्कप्रमुख,प्रसिद्धीप्रमुख यांची बिनविरोध निवड झाली.

निवड झाल्या निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तालुक्याचे गटविकास अधिकारी प्रमिला वाळूज तसेच गटशिक्षणाधिकारी रूपाली धोका विस्तार अधिकारी कल्पना टाकळकर संचिता अभंग यांनी त्यांचे अभिनंदन केले आंबेगाव तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनेच्या वतीने नवनिर्वाचित केंद्रप्रमुख पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

1009969896

केंद्र प्रमुख पदोन्नती १९९४ च्या ३०-४०-३०अधिनियमानुसार भरणार होते परंतु ह आधीनियम महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षित एम एड शिक्षक कृती समितीच्या माध्यमातून रद्द करून पन्नास पन्नास टक्केचा जीआर शासनाकडून प्राप्त केला गेल्यामुळे आणि वयाची अट रद्द केल्यामुळे शंभर टक्के कार्यान्वित प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदाची संधी मिळाली त्यामुळे यापुढे सुद्धा केंद्रप्रमुख संघटनेच्या माध्यमातून व एमएड शिक्षक कृती समितीच्या माध्यमातून उच्चशिक्षित तसेच कार्यरत प्राथमिक शिक्षकांमधूनच केंद्र प्रमुख,विस्तार अधिकारी या सर्व जागा तातडीने भरण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे, व नवीन शैक्षणिक धोरण NEP २०२०च्या धोरणानुसार कार्यरत उच्चशिक्षित प्राथमिक शिक्षकांना उच्च पदावर संधी प्राप्त करून घेण्यासाठी मंत्रालय पातळीवर पाठपुरावा करणार असल्याचे नवनिर्वाचित आंबेगाव तालुका केंद्रमुख संघटनेचे तालुकाध्यक्ष राजू जाधव यांनी सांगितले..

1009962020
1009944556

Related posts

राजुरी मध्ये ६७६ रुग्णांची मोफत नेत्र तपासणी ;२८९ रुग्णांना मोफत चष्मे वाटप तर १३९ रुग्णांची होणार मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया !!

Chief Editor

राज्य शासनाच्या वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी व्हा;राज्य शासनाचे सन २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट- -उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

Chief Editor

खडकवाडी (ता.आंबेगाव) येथे संपन्न होणार भैरवनाथ यात्रा महोत्सव !!

Chief Editor

Leave a Comment