
पंचनामा प्रतिनिधी – संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील अजामेळा दिंडी कृ २६ चे आदर्श गाव गावडेवाडी (ता.आंबेगाव ) येथून पंढरपूरला जाण्यासाठी प्रस्थान ठेवण्यात आले अशी माहीही दिंडी क्र.२६ चे प्रमुख ह.भ.प.
पत्रकार मधुकर महाराज गायकवाड ,दिंडीचे चोपदार मधुकर महाराज साळवे यांनी दिली.

आळंदी प्रशासनाने दिंड्यांनी आळंदीत येऊ नये अशी आवाहन केल्याने अजामेळा दिंडीने या सूचनेला प्रतिसाद देऊन गावडेवाडी येथून गुरुवारी (ता.९ ) वारकऱ्यांच्या उपस्थितीत गावडेवाडी येथे छत्रपती शिवाजी चौकात पंढरपूरला जाण्यासाठी प्रस्थान ठेवले.

यावेळी दिंडीचे संस्थापक वैकुंठवासी निवृत्ती महाराज गायकवाड व सुभद्राबाई निवृत्ती महाराज गायकवाड यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ.पांडुरंग निवृत्ती महाराज गायकवाड,भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मच्छिंद्र रामदास गावडे,कारखान्याचे मा.उपाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली गावडे यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी गावडेवाडीचे ग्रामस्थ बहुसंख्येने हजर होते.

पुंडलिक वर देव हरी विठ्ठल च्या गजरात दिंडीने प्रस्थान ठेवले.यावेळी मच्छिंद्र शेठ गावडे, ऋषिकेश गावडे, संतोष गावडे, ह.भ.प.सुरेश महाराज गावडे, ह.भ.प.बाळू बुवा शेळके ,ह.भ.प.ज्ञानेश्वर सावित्रू गावडे, ह.भ.प.लहू महाराज गावडे मंदाताई गावडे,सविता मधुकर महाराज गायकवाड, अनिता गावडे, सुनिता सुक्रे त्याचप्रमाणे कमलादेवी मळ्यातील बहुसंख्य तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी डॉ.प्रतिक गायकवाड,प्रा.शीलाताई पांडुरंग गायकवाड तसेच महिला चांगुणाबाई शेळके,कौसाबाई टाव्हरे, हरणाबाई टाव्हरे,सुनील महाराज राजगुरू,बाळू महादू राजगुरू,वाहन चालक कैलास शेठ पडवळ,पिकप चालक बाबाजी गव्हाणे आदींनी दिंडीला सहाय्य केले.यावेळी गावडेवाडी ग्रामस्थांनी सर्वांना दिंडी ला प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.यामध्ये भिवाजी नाना उमाजी गावडे,अनाजी मारुती गावडे,नरेंद्र गावडे,तंटामुक्तीचे अध्यक्ष रवींद्र रघुनाथ गावडे,मा.सरपंच देवराम तात्या गावडे,मा.सरपंच संतोष गावडे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्वांच्या वतीने दिंडीला शुभेच्छा दिल्या

आदर्श गाव गावडेवाडी (ता . आंबेगाव ) येथून माऊलींच्या पायी वारी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अजमेळा दिंडी क्रमांक २६ ने प्रस्थान ठेवले

