सामाजिक

शिक्षण व शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांसाठी आंबेगाव तालुका मुख्याध्यापक संघाचे तहसीलदार डॉ.सचिन वाघ यांना निवेदन !!

1010119557
1010119557

पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुका सह महाराष्ट्र राज्यातील शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षणप्रेमी यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात आंबेगाव तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने घोडेगाव (ता.आंबेगाव ) येथे तहसीलदार डॉ.सचिन वाघ यांना मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे पाठविण्यासाठी निवेदन सादर करण्यात आले.

या निवेदनामध्ये टीईटी अनिवार्यता, पदोन्नती प्रक्रिया, बीएलओ (BLO) कामकाजामुळे होणारे शैक्षणिक नुकसान तसेच शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्न याबाबत शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.

यासाठी प्रमुख सहभागी झालेले आंबेगाव तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनील वळसे पाटील, कार्याध्यक्ष राजू आढळराव पाटील, उपाध्याक्ष नितीन बाणखेले , जिल्हा खजिनदार विनोद बोंबले, सचिन अनिल देसले सचिव, आनंद कोकणे व प्रकाश चव्हाण व संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

संघटित प्रयत्नातूनच शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांना न्याय मिळेल, असा विश्वास अध्यक्ष सुनील वळसे पाटील यांनी व्यक्त केला.शिक्षकांचा सन्मान- विद्यार्थ्यांचे हित असे प्रतिपादन राजू आढळराव यांनी केले तर गुणवत्तापूर्ण शिक्षण हाच आमचा संकल्प असे मत विनोद बोंबले यांनी व्यक्त केले.शिक्षकांना अध्यापनाचे पवित्र कार्य पूर्णवेळ करू द्यावे ही तर बाह्यकामे कमी करावेत असे मत नितीन बाणखेले यांनी यांनी व्यक्त केले.

घोडेगाव (ता.आंबेगाव ) येथे तहसिलदार यांना निवेदन देताना मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी

1009850407

Related posts

पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी,खडकवासला धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ; जलसाठा जवळपास पूर्ण क्षमतेकडे !!

Chief Editor

समर्थ विधी महाविद्यालय बेल्हे येथे विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्नराष्ट्रीय व जागतिक स्तरावर स्पर्धेसाठी कायद्याचे शिक्षण इंग्रजीत घ्या-ॲड.अहमद खान पठाण

Chief Editor

“मनातलं गाणं… आता रंगमंचावर!”महानगायक मोहम्मद रफी स्मृतिदिनानिमित्त धामणीत ‘यादे…’ची सुरेल मैफल; ‘या गायक व्हा’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद !!

Chief Editor

Leave a Comment