सामाजिक

वैदवाडी (जारकरवाडी ) येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवींना विनम्र अभिवादन !!

1010555117
1010555117

पंचनामा प्रतिनिधी – राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त जारकरवाडीच्या वैदवाडी येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी अहिल्यादेवींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कार्यकाळात न्यायप्रिय, लोककल्याणकारी आणि प्रजाहितदक्ष राज्यकर्त्या म्हणून आदर्श निर्माण केला. त्यांनी सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य देत रस्ते, विहिरी, घाट, धर्मशाळा आणि मंदिरांच्या उभारणीसह विविध लोककल्याणकारी कामांना चालना दिली. देशभरातील अनेक तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठीही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. न्याय, समता, धार्मिक सहिष्णुता आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांचा आदर्श त्यांनी आपल्या कार्यातून समाजासमोर ठेवला.

अहिल्यादेवींचे जीवन हे कर्तृत्व, धैर्य, संवेदनशीलता आणि लोकसेवेचा प्रेरणादायी आदर्श असून, त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा आदर्श आजच्या पिढीने घेण्याची गरज आहे.

या कार्यक्रमास मंगेश कापडी, अनिल कापडी, सागर कजबे, राजू वैद, अविनाश वैद, संतोष कापडी, तुषार वैद यांच्यासह ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते. भक्तिमय आणि भावपूर्ण वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला.

1010457105
1010480394

Related posts

मंचर (ता.आंबेगाव) एस.टी.बस स्थानकाचा होणार कायापालट; ५ कोटी ३६ लाखांच्या विकासकामांना प्रशासकीय मंजुरी;मा.मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या पाठपुराव्याला मोठे यश !!

Chief Editor

शाळेतील किशोरवयीन मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी उपक्रम !!

Chief Editor

युवा ताशावादक जालिंदर शेवाळे यांना आंबेगाव भूषण पुरस्कार प्रदान !!

Chief Editor

Leave a Comment