सामाजिक

आदर्श माध्यमिक विद्यालय जारकरवाडीचा दहावीचा निकाल ९४%

img20260509075753 1536x1152
img20260509075753 1536x1152

पंचनामा प्रतिनिधी – राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र संचलित आदर्श माध्यमिक विद्यालय, जारकरवाडी (ता. आंबेगाव, जि. पुणे) या विद्यालयाचा सन २०२५-२६ च्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल ९४ टक्के लागला असल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक शशिकला वाघमारे यांनी दिली विद्यालयाच्या यशाबद्दल जारकरवाडी परिसरातून यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.

विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. परीक्षेत प्रथम पाच क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :
१) सार्थक विजय भांड – ९२.२ %
२) कु. अक्षदा बाळू वनवे – ९०.६ %
३) सार्थक नामदेव भांड – ८७.६ %
४) कु. दुर्गा पंढरीनाथ लबडे – ८५.२० %
५) कु. सानिका संतोष लबडे – ८१.४० %
६) कु. कार्तिकी बाळासाहेब भोजणे – ८१.२० %

विद्यालयाच्या या यशाबद्दल सर्व गुणवंत विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक व पालकांचे जारकरवाडी ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापकांसह शिक्षकवृंदांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले.

fb img 1774661444136

Related posts

समर्थ गुरुकुलचा (CBSE) दहावीचा १००% निकाल !!

Chief Editor

भ्रष्टाचार : देशाचा आणि गावाच्या विकासाला लागलेली घातक कीड

Chief Editor

तत्वनिष्ठ बीटी भाऊ देशमुख…विधिमंडळाचे एक दिवसीय विशेष अधिवेश बोलवायला लावणारा आमदार !!

Chief Editor

Leave a Comment