सामाजिक

विद्यापीठस्तरीय ‘आविष्कार’ संशोधन स्पर्धेसाठी समर्थ कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांची निवड !!

img 20261111 wa0387
1011657565

आदित्य कांबळे आणि अथर्व थोरात यांची संशोधन प्रकल्पांच्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरी !!

पंचनामा प्रतिनिधी – समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, बेल्हे येथील दोन विद्यार्थ्यांची विद्यापीठस्तरीय ‘आविष्कार’ संशोधन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील आदित्य कांबळे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग (AI & ML) विभागातील अथर्व थोरात यांनी आपल्या संशोधन प्रकल्पांच्या माध्यमातून ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

 विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण करणे, त्यांच्या नावीन्यपूर्ण संकल्पनांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन व संशोधनवृत्ती विकसित करणे या उद्देशाने महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करण्यात आले. या मार्गदर्शनाच्या बळावर दोन्ही विद्यार्थ्यांनी आपल्या संशोधन प्रकल्पांची प्रभावी मांडणी करत विद्यापीठस्तरीय स्पर्धेसाठी स्थान मिळविले.

या निवड प्रक्रियेत महाविद्यालयाचे शैक्षणिक आणि संशोधन समन्वयक प्रा. सचिन शेळके यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच आविष्कार स्पर्धेच्या नियोजनापासून ते समन्वयापर्यंतची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली.

 विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. स्नेहलताई शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा. राजीव सावंत, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नवनाथ नरवडे, प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, विभागप्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

 विद्यार्थ्यांच्या या यशामुळे समर्थ कॉलेजमधील संशोधन, नवोपक्रम आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्रोत्साहन मिळाले असून, विद्यापीठस्तरीय स्पर्धेतही विद्यार्थी उज्ज्वल यश संपादन करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
1011605849

Related posts

डिंभे धरणाचा उजवा कालवा पाणी नव्हे तर प्लॅस्टिक वस्तू वाहण्याचे उत्तम साधन !!

Chief Editor

राजगुरूनगर येथे संत निरंकारी मिशनद्वारा आयोजित रक्तदान शिबिरात 159 जणांनी केले रक्तदान !!

Chief Editor

महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत तीन महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांचे शनिवारी भूमिपूजन !!

Chief Editor

Leave a Comment