
पंचनामा प्रतिनिधी – इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन (IPA), आळेफाटा स्थानिक शाखेच्या वतीने आयोजित विविध राज्यस्तरीय फार्मसी स्पर्धांमध्ये समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी व समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बेल्हे येथील डी. फार्मसी आणि बी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. विविध स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांसह उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवून विद्यार्थ्यांनी संस्थेच्या शैक्षणिक यशात मानाची भर घातली.
जय हिंद कॉलेज ऑफ फार्मसी, वडगाव सहानी येथे आयोजित राज्यस्तरीय पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत डी. फार्मसीच्या कु. मानसी वनवे व कु. रेश्मा तांबोळी यांनी प्रथम क्रमांक, तर बी. फार्मसीच्या ओम जगदाळे याने द्वितीय क्रमांक पटकाविला. याच स्पर्धेतील हर्बेरियम निर्मिती प्रकारात कु. ऋतुजा भगत हिने उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले.
सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी, शिरूर येथे झालेल्या राज्यस्तरीय इनोव्हेटिव्ह मॉडेल मेकिंग स्पर्धेत बी. फार्मसीच्या कु. अश्विनी भोर व कु. प्रतिभा गावडे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. तसेच शांतिनिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी, धोत्रे, अहिल्यानगर येथे आयोजित राज्यस्तरीय पेपर प्रेझेंटेशन स्पर्धेत कु. आकांक्षा टेमकर व कु. मानसी मुटके यांनी तृतीय क्रमांक संपादन केला.
विशाल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, आळे येथे आयोजित राज्यस्तरीय पेपर प्रेझेंटेशन स्पर्धेत डी. फार्मसीच्या कु. मानसी वनवे व कु. रेश्मा तांबोळी यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. याच विद्यार्थिनींनी श्री स्वामी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, माळवाडी-बोटा येथे झालेल्या राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेतही द्वितीय क्रमांक मिळवून आपल्या यशाची चमक दाखविली.
या यशामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, संशोधनवृत्ती, सर्जनशीलता, नाविन्यपूर्ण विचारसरणी आणि सादरीकरण कौशल्य अधोरेखित झाले आहे. विद्यार्थ्यांना या स्पर्धांसाठी महाविद्यालयातील प्राध्यापकवृंदाने मार्गदर्शन केले.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. स्नेहलताई शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा. राजीव सावंत, समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. कुलदीप रामटेके, समर्थ कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. संतोष घुले, प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर यांच्यासह संस्थेतील सर्व प्राचार्य व विभागप्रमुखांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.


