सामाजिक

ढोबळेवाडी (जारकरवाडी) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अभिनव पद्धतीने साजरा झाला शिवजयंती उत्सव सोहळा !!

img 20260219 wa0656
img 20260219 wa0656

पंचनामा लोणी (धामणी) प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या जारकरवाडी गावच्या ढोबळेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अभिनव पद्धतीने शिवजयंती उत्सव सोहळा संपन्न करण्यात आला.

यावेळी पारंपारिक पद्धतीने पालखीतून महाराजांच्या प्रतिमेचे मिरवणुक संपन्न झाली.गावातील सर्व महिला भगिनींनी ढोल ताशाच्या गजरात लेझीम खेळत,फुगड्या घालत, पाळणा गीत गात,फेर धरत मिरवणुकीत सहभाग नोंदवला.चिमुकल्या विद्यार्थ्यांनी महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे पोवाडे गायले.

img 20260219 wa0586

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोबळेवाडी या शाळेत नेहमीच संस्कारक्षम उपक्रम राबविले जात असतात.परिसर अभ्यास, प्रत्यक्ष कार्य भेट दौरा,दप्तरविनी शाळा, आठवडे बाजार,खाऊ गल्ली, बोलक्या भिंती,सामाजिक बांधिलकी जपणारे विविध उपक्रम,वार्षिक स्नेहसंमेलन,विविध स्पर्धा परीक्षा व त्यासाठी आवश्यक असणाऱ्या मार्गदर्शिका आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत.

कार्यक्रमाच्या शेवटी महाराजांची आरती झाली. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रशासन,शालेय व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक अशोक हिंगे सर, सहशिक्षिका मनिषा हिंगे, अंगणवाडीताई लताश्री लबडे, निर्मला पाचपुते, गावातील सर्व तरुण सहकारी यांनी केले.

fb img 1771121534243

Related posts

लोणी (धामणी) येथे महाशिवरात्र यात्रा उत्सवानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन; मंगळवार दि.१७ व बुधवार दि.१८ फेब्रुवारी २०२६ रोजी रंगणार बैलगाडा शर्यतीचा थरार!!

Chief Editor

समर्थ ज्युनिअर कॉलेजमध्ये गुणवंतांचा दिमाखदार गौरव सोहळा संपन्न;आवडीनुसार क्षेत्र निवडा; जीवनात यशस्वीता नक्कीच मिळेल– प्रा.राजीव सावंत

Chief Editor

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमासाठी राजकीय पक्षांनी निष्ठापूर्वक सहकार्य करावे- उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर

Chief Editor

Leave a Comment