सामाजिक

मैत्री म्हणजेच आभाळाला पडलेलं सोनेरी स्वप्न..मैत्री म्हणजेच नवरत्नाच्या हारातील “अनमोल रत्न”..!”

1009498163
1009527837

आयुष्य हे समुद्र आहे आणि मन हा किनारा….आणि मैत्री म्हणजे समुद्रातील लाटा आहेत. समुद्रात किती लाटा आहेत ते महत्वाचं नाही तर किनार्‍याला कीती पोहचतात याला खरं महत्व आहे. जसं निसर्गाला रंग हवा असतो, फुलाला सुगंध हवा असतो..तसंच माणूस तरी एकटा कसा राहणार त्यालाही मैत्रीचा गंध हवा असतो..

मैत्री असते कधी शिकवण तर कधी आठवण तहान लेल्या चातकाला जशी पावसाची वणवण तरीही ती या जीवनात असावी आपल्या सुखाचा “आसमंत” फुलवणारी मैत्री असावी एक वेगळंच आणि सुगंधित आयुष्य घडवणारी, तसंच हृदयाला भिडणारी…!!

एकही मित्र नाही असा माणूस या पृथ्वीतलावर कुठेच नसेल. थोड्यापुरती का होईना प्रत्येका नेच मैत्री ही केलेलीच असेल…

शरिरात रक्त नसलं तरी चालेल पण आयुष्यात मैत्री ही हवीच. मैत्री कीतीही जुनी झाली तरी मात्र ती वाटते नेहमी नवीच..रक्ताच्या नात्यात नसेल एवढी मैत्रीच्या नात्यात ओढ असते. कशीही असली तरी शेवटी मैत्री ही गोड असते. मैत्री म्हणजेच त्याग आहे. मैत्री म्हणजेच एक अतूट असा विश्वास.. हवा एक फक्त नावापुरतीच मैत्री म्हणजेच खरा श्वास.मैत्रीच्या या नात्याबद्दल लिहिण्यासारखे खूप आहे. ख-या नात्यांला नसले तरी मैत्रीला एक सुंदर असे रुप आहे. मैत्रीला कधी गंध नसतो. मैत्रीला रंग नसतो, मैत्रीचा फक्त छंद असतो. “मैत्री करावी सर्वांनीच त्यातच तर खरा आनंद असतो. मैत्री करावी सर्वांनी त्यातच तर खरा आनंद असतो”.

तुमचा पोषाख कितीही सुंदर आणि मौल्यवान असला तरी तुमच्या खराब चरित्राला तो झाकून ठेवू शकत नाही.. म्हणूनच आयुष्यात असे मित्र नक्कीच जवळ असू द्यावेत जे तुमच्या मनातील गोष्ट अशी समजून घेतील की ज्याप्रमाणे मेडिकल स्टोअर्स वाले डाॅक्टरांच्या हॅण्डराईटींगला समजून घेतात..!! आपले संस्कार, विचार, व्यवहार तथा कर्म हे उत्तम आणि आदर्श बनवण्याचा प्रयत्न नक्कीच करूया..व आपले जीवन सुंदर, सुसंस्कृत तसेच समृद्ध बनवूया..!!

राजकारणातील “मित्र” चित्रपटातील मनमोहक “चित्र “ आणि नाटकातील “पात्र” हे कधीच खरे नसतात… तिथे फक्त मुखवटे असतात… खरे असतात ते फक्त आपले आणि आपलेच जीवलग व सच्चे “मित्र “ म्हणूनच नेहमी मित्रांच्या संपर्कात रहा..सुख दुःखात सहभागी रहा…!!

कवी अनंत राऊत यांनी मैत्रीवर अत्यंत मार्मिक भाषेत लिहून ठेवलंय.. “दुःख” अडवायला उंब-यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा..”

जेंव्हा आपण दुःखात असतो.. त्या दुःखाच्या काळात आपल्या ला सावरण्याचं काम हे मित्रच करत असतात…! नाराजीच्या काळोखात तो आपल्या आयुष्यात प्रकाशाची पेरणी करतो अन् संघर्षाच्या काळात मदतीस धावून येतो..!

परंतू जगभरात सध्या मित्रांची कमतरता जाणवत आहे. जुन्या काळात मित्रांचा भरपूर गोतावळाअसायचा. प्रत्येकाकडे कडे सुमारे 100 मित्र तरी असायचेच पण हिच संख्या आज 10 मित्रांवर आली आहे.
आता एकटेपणा सहन करणेही कठीण झाले आहे. कारण एका सर्वेक्षणानुसार देशातील 12% लोकसंख्येला एकही मित्र नाही.
पूर्वी मित्रांसोबत प्रत्यक्ष भेटून घालवलेला वेळ 1 तास असायचा, तर सध्या तो फक्त 35 मिनिटांवर आला आहे.
चांगले मित्र म्हणजे जणू जीवन विम्यासारखे असतात. “जींदगी के साथ भी और जींदगी के बाद भी
ज्यांना मित्रच नसतात ते दिवसाला 20 सिगारेट ओढल्याइतका ताण (Stress) अनुभवतात असे सांगितले जाते. संशोधनानुसार चांगले मित्र असलेल्या लोकांमध्ये रक्तदाब (Blood Pressure) आणि हृदयविकार कमी प्रमाणात आढळतात. मित्रांसोबत राहणारे लोक उत्साही असतात, व्यायाम, खेळ आणि इतर उपक्रमांमध्ये सक्रियपणे भाग घेतात. त्यांच्या सहवासामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
पण मैत्री आपोआप वाढत नाही. मैत्रीसाठी वेळ हीच मोठी गुंतवणूक आहे. एकदा चांगली मैत्री निर्माण झाली की ती टिकवण्यासाठी दररोज थोडा वेळ द्यावा लागतो. आपल्या कामाच्या ठिकाणी आपण जी मैत्री समजतो ती बहुतेक वेळा वरवरची असते. फेसबुक आणि व्हॉट्सअप वरील मैत्री क्षणिक असते. एकूणच मैत्रीचे संबंध कमी होत चालले आहेत. यामागे अनेक कारणे असली तरी “वेळ नाही मित्रा!” हेच सर्वात मोठे कारण आहे. वेळ द्या. चांगली मैत्री जोपासा निदान असलेले मित्र तरी जपायलाच हवेत…

मैत्री म्हणजे आभाळाला पडलेलं सोनेरी स्वप्न, मैत्री म्हणजेच नवरत्नाच्या हातातील अनमोल रत्न, मैत्री म्हणजेच वेलीवर उमललेलं सुगंधी फुलं..मैत्री म्हणजेच पोळ्याच्या सणाला बैलाच्या अंगावर घातले ली झूल..मैत्री म्हणजेच दोन मनांना जोडणारा सेतू..मैत्रीचाच दुसरा अर्थ फक्त “मी” आणि तू..!!

मैत्री ही कधीच ना परिक्षा घेते ,ना कधी परिक्षा देते ! मैत्री ही अशी असते जी कोसळणा ऱ्या पावसात भिजलेल्या चेहर्‍यावरील अश्रूंना पण ओळखते..आज मी जेंव्हा भगवंतासोबत मैत्रीची चर्चा केली तेंव्हा भगवंताने सांगितल की सांभाळून ठेव या मैत्रीला कारण हीच माझी खरी पसंद आणि खरी संपत्ती आहे जी तुझ्या हिश्शयाला आली आहे.. दिवस जात राहतात सोनेरी आठवणी मात्र जिवंत राहतात एक कहाणी बनून..परंतू मित्र हे नेहमीच आपल्या ह्रदयात राहतात कधी चेहर्‍यावरील मुस्कुराहट तर कधी डोळ्यातील पाणी बनून..म्हणूनच हे मित्र परिसासारखे असावेत म्हणजेच आयुष्याचं सोनं व्हायला वेळ लागणार नाही…!!


श्री.निळकंठ बाबाराव पाटील, मैलापूरे, कारेगावकर ….
छत्रपती संभाजीनगर
मो. नं. – 9881084320


92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 353521
1009713189

Related posts

जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने भीमाशंकर कारखाना परिसरात वृक्ष लागवड संपन्न !!

Chief Editor

डॉ.डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर बिझनेस मॅनेजमेंट, आकुर्डी, पुणेच्या विद्यार्थ्यांकडून जवळे (ता.आंबेगाव) गावात वृक्षारोपण उपक्रम उत्साहात संपन्न !!

Chief Editor

राजुरी येथे जागतिक महिला दिनानिमित्त प्रत्यंगिरा चंडीपाठाचे आयोजन !!

Chief Editor

Leave a Comment