सामाजिक

झाडांच्या गर्दीत आणि खड्ड्यात हरवला आहे जारकरवाडी फाटा ते लोणी (धामणी) रस्ता !!

1010280835

पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव व शिरूर, खेड, जुन्नर अशा चार तालुक्यांना जोडणारा मंचर – लोणी रस्ता जारकरवाडी फाटा ते लोणी दरम्यान झाडांच्या गर्दीत आणि खड्ड्यात हरवून गेला असल्याचे चित्र समोर आले आहे.

लोणी ते मंचर (ता.आंबेगाव) या रस्त्यावर भोजन दरा व लोले वस्ती जवळ रस्त्याला झाडाझुडपांचा विळखा बसला आहे.या रस्त्याच्या दोन्ही बाजूने झाडे झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने रस्त्यालगत असणारी झाडेझुडपे काढावी अशी मागणी उपसरपंच सचिन टाव्हरे, मोहन दरेकर,उद्योजिका ज्योती गोरडे यांनी केली आहे.

सदर रस्ता जारकरवाडी मार्गाने अवसरी ,मंचर,घोडेगाव,नारायणगाव येथे या भागातील नागरिक कामासाठी तसेच विद्यार्थी कॉलेजला जा ये करत असतात.त्यामुळे समोरा समोरून येणारी वाहने दिसत नाही. यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय या ठिकाणी रस्त्यावर खड्डे असल्याने वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते.

विशेषता या झाडा झूडपात निरघुडीचे प्रमाणत जास्त आहे. रस्त्यांच्या देखभाल,दुरूस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.त्यामुळे या विभागाने याकडे लक्ष देऊन रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडे तातडीने काढण्यात यावी अशी मागणी येथील स्थानिक नागरिक व वाहन चालक यांनी केली आहे.

लोणी मंचर (ता.आंबेगाव ) या रस्त्यावर जारकरवाडी येथील भोजनदरा नजिक व लोले- वस्ती येथे झाडाझुडपांचा विळखा


1009850407

Related posts

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगावपीर,प्रगती विद्यालय वडगावपीर,माजी सैनिक योद्धा सेवा भावी संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने कारगिल विजय दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन !!

Chief Editor

हुमणी किड नियंत्रणासाठी प्रकाश सापळ्याचा वापर फायदेशीर..

Chief Editor

देवगाव (ता.आंबेगाव) येथील शेतरस्त्याचा वाद अखेर मिटला;पारगाव (कारखाना) पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या मध्यस्थीला आले यश !!

Chief Editor

Leave a Comment