सामाजिक

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जयंती नेहरू विद्यालयात वृक्षारोपन करून साजरी !!

1010281353

पंचनामा प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर विविध ठिकाणी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येत असून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील
निरगुडसर येथील पंडीत जवाहरलाल नेहरू माध्यमिक व दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. व वृक्षारोपन करण्यात आले.

यावेळी प्राचार्य कांताराम टाव्हरे, पर्यवेक्षक संतोष वळसे व कर्मचाऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी व पालकांनी त्यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. सार्वजनिक जीवनात त्यांनी केलेले योगदान, प्रशासनातील कामकाजाची शैली आणि जनसामान्यांसाठी केलेल्या कार्याचा यावेळी उल्लेख करण्यात आला.

यावेळी तालुक्यात सर्व प्राथमिक, माध्यमिक व विविध संस्थांनी दिवंगत अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून विविध कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

1009850407

Related posts

समर्थ गुरुकुल मध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा संपन्न ; ४३७ विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद !!

Chief Editor

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगावपीर,प्रगती विद्यालय वडगावपीर,माजी सैनिक योद्धा सेवा भावी संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने कारगिल विजय दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन !!

Chief Editor

देवगाव (ता.आंबेगाव) येथील शेतरस्त्याचा वाद अखेर मिटला;पारगाव (कारखाना) पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या मध्यस्थीला आले यश !!

Chief Editor

Leave a Comment