सामाजिक

जारकरवाडीच्या श्रेया धनेश कुसळची इस्रो-नासा शैक्षणिक उपक्रमासाठी निवड ; दिल्लीतील जंतरमंतर, नेहरू तारांगण व राष्ट्रपती भवनाला देणार भेट !!

img 20261028 wa0923
1011494240

पंचनामा प्रतिनिधी जारकरवाडी – आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी कु. श्रेया धनेश कुसळ हिची इस्रो-नासा या शैक्षणिक उपक्रमांतर्गत दिल्ली येथे आयोजित अभ्यासभेटीसाठी निवड झाली आहे. या निवडीमुळे जारकरवाडी गावासह शाळेच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुणे जिल्हा परिषद पुणे अंतर्गत कार्यरत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जारकरवाडी येथील श्रेया कुसळ हिला दिल्ली येथील जंतरमंतर, नेहरू तारांगण आणि राष्ट्रपती भवन या महत्त्वपूर्ण स्थळांना भेट देण्याची संधी मिळणार आहे. विज्ञान, खगोलशास्त्र आणि अवकाश संशोधनाविषयी विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा निर्माण व्हावी, तसेच त्यांना प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळावे, या दृष्टीने अशा शैक्षणिक उपक्रमांचे महत्त्व मोठे आहे.

श्रेया हिच्या या उल्लेखनीय निवडीबद्दल शाळेच्या वतीने तिचे विशेष अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला वाव देण्यासाठी आणि त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी शाळा सातत्याने प्रयत्नशील असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

या यशामागे श्रेया हिची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले आहे. तिच्या या यशामुळे शाळेतील इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार आहे.

गटविकास अधिकारी मा. प्रमिला वाळुंज मॅडम, गटशिक्षणाधिकारी मा. रुपाली धोका मॅडम, गटविस्तार अधिकारी अभंग मॅडम, केंद्रप्रमुख श्री.मच्छिंद्र विठ्ठल काळे, मुख्याध्यापक श्री. शिवाजी चासकर व श्री.अब्दुल इनामदार यांनी श्रेयाच्या कामगिरीबद्दल तिचे व तिच्या पालकांचे कौतुक केले आहे.

श्रेयाला श्री.गोरक्ष विष्णू उकिरडे, श्री. सुदर्शन गंगाधर रासकर, सौ. रेखा सुनील वळसे, सौ. उज्ज्वला नंदकुमार लंगडे, सौ. सुनीता गोपाळ रोडे व श्री. अशोक नामदेव किरवे या गुरुजनांचे मार्गदर्शन लाभले.

श्रेया हिच्या या यशाबद्दल शालेय व्यवस्थापन समिती जारकरवाडी, सर्व विद्यार्थी, जारकरवाडी ग्रामस्थ, सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य यांच्या वतीने तिचे अभिनंदन करण्यात आले असून, तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

1011423306

Related posts

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना – २०२६’ अंतर्गत १६ लाख ९६ हजार पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर !!

Chief Editor

नाते कलेचे माझ्या रक्ताशी – तमाशा रंगभूमीवरील अष्टपैलू सोंगाड्या रमेश खुडे यांचा चार दशकांचा कलाप्रवास !!

Chief Editor

शिरदाळे येथे शाळकरी मुलांकडून शिवजयंती उत्साहात साजरी !!

Chief Editor

Leave a Comment