सामाजिक

श्री भैरवनाथ विद्याधामच्या विद्यार्थ्यांची भोसरी विभागीय स्पर्धेसाठी निवड ; धावण्याच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी ; शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा !!

1011491376
1011491376

पंचनामा प्रतिनिधी – लोणी (ता.आंबेगाव ) येथील शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री भैरवनाथ विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत भोसरी येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड मिळवली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
भोसरी येथे होणाऱ्या विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी शाळेतील चार विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

यामध्ये १७ वर्षांखालील मुलांच्या गटात अर्थव कोल्हे याने ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत जिल्हा पातळीवर द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच १७ वर्षांखालील मुलींच्या गटात तन्वी बाळशिराम वाळुंज हिने ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत जिल्हा पातळीवर द्वितीय क्रमांक पटकावला.

१९ वर्षांखालील मुलींच्या गटात अक्षदा रोहितदास लंके हिने १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक तर ८०० मीटर मीटर धावण्याच्या स्पर्धेत जिल्हा पातळीवद्वितीय क्रमांक मिळवला.व या तिन्ही विद्यार्थ्यांची विभागीय पातळीवर निवड झाली आहे.

विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशामागे त्यांची मेहनत, सराव आणि मार्गदर्शकांचे प्रयत्न महत्त्वाचे ठरले आहेत. विभागीय स्पर्धेतही हे विद्यार्थी उत्कृष्ट कामगिरी करून शाळेचा नावलौकिक वाढवतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शिरूर शिक्षण प्रसारक मंडळ, माजी विद्यार्थी प्रबोधनी, ग्रामस्थ, पालक, शाळेचे शिक्षकवृंद आणि क्रीडाप्रेमींकडून अभिनंदन करण्यात येत असून पुढील स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. अशी माहिती प्राचार्य सुनिल थोरात व अरुण साकोरे यांनी दिली आहे.

विशेष म्हणजे तालुका क्रिडा स्पर्धा ते जिल्हा क्रिडा स्पर्धेमध्ये सहभागी होणार्या प्रत्येक विद्यार्थाला जनकल्याण सहकारी पतसंस्थेच्या वतीने ट्रकसूट व टि शर्ट देण्यात आला.

लोणी (ता.आंबेगाव ) येथील विद्यालयातील विभागीय पातळीवर निवड झालेले विद्यार्थी.

92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 399503

Related posts

अवसरी बुद्रुक येथे भव्य कृषी मेळावा व चर्चासत्र उत्साहात संपन्न !!

Chief Editor

समर्थ पॉलिटेक्निकचा हिवाळी परीक्षेचा निकाल ९८.४७% ;४६ विषयांचा निकाल १००%

Chief Editor

पाबळ येथे सोयाबीन पीक पद्धतीवर प्रशिक्षण

Chief Editor

Leave a Comment