
पाबळ : मौजे पाबळ येथे आज (ता. ४) सोयाबीन पीक पद्धतीवर आधारित शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी कृषी विज्ञान केंद्र, नारायणगावचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दत्तात्रय गावडे यांनी शेतकऱ्यांना सोयाबीन, मूग व उडीद पिकांमधील विविध कीड व रोगांचे व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

मंडळ कृषी अधिकारी, पाबळ शिवाजी पाटील यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME) योजनेची सविस्तर माहिती देत शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. पाबळचे सहाय्यक कृषी अधिकारी गणेश ताठे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

TVS कंपनीच्या श्रीमती संगीता वाळुंज यांनी दशपर्णी अर्क व जीवामृत तयार करण्याची पद्धत, तसेच त्याचा शेतीमध्ये उपयोग याबाबत प्रात्यक्षिकासह माहिती दिली.
या प्रशिक्षण कार्यक्रमास पाबळ परिसरातील शेतकरी बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमातून शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापन, कीड-रोग नियंत्रण आणि कृषी विभागाच्या विविध योजनांबाबत उपयुक्त माहिती मिळाली.





