सामाजिक

मांदळेवाडी (ता.आंबेगाव) येथे वादळी वारा आणि पावसाने झाले शेतकऱ्यांचे नुकसान !!

1009723031

पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील जारकरवाडी, लोणी, धामणी लाखणगाव, पोंदेवाडी परिसरात रविवारी मान्सून पावसाने दमदार हजेरी लावली ज्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या पावसादरम्यान वादळी वारे,कडकडणारी वीज आणि वीज पडल्यामुळे मांदळेवाडी येथे नागरीकांचे मोठे नूकसान झाले आहे.येथील ॲड.अशोक पालेकर पाटील यांच्या सोलर वर वीज पडून स्फोटा सारखा आवाज होऊन सोलरचे मोठे नुकसान झाले आहे.

विलास गोरडे, संभाजी आदक, दगडूभाऊ आदक, मारुती मंदिर व ग्रामपंचायत मधील इनव्हटरचे विजेच्या मोठ्या आवाजाने मोठे नुकसान झाले आहे. तर जोरदार वारा, कडकडणारी वीज यामुळे मांदळेवाडी येथील वीज रविवार ( दि.२१) रोजी चार वाजता गायब झाली ती सोमवार (दि.२२) दुपार पर्यंत आली नव्हती त्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्र निर्माण झाला होता.

1009828025
1009828034

Related posts

तीन पिढ्यांचा एकत्रित रक्षाबंधन सोहळा उत्साहात !!

Chief Editor

धामणी (लोणी) च्या वेदमूर्ती मंदार क्षिरसागर यांना ॠग्वेद पुरस्कार प्रदान !!

Chief Editor

सकारात्मक दृष्टिकोन, जिद्द, अविरत कष्ट,ध्येय यांच्या सोबतीला आधुनिक तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर हीच यशाची गुरुकिल्ली – मा.खा.श्री.शिवाजीराव (दादा) आढळराव पाटील

Chief Editor

Leave a Comment