सामाजिक

जांभोरी येथे पारंपरिक पद्धतीने बैलपोळा सण उत्साहात साजरा ; ढोल-ताशा आणि बँजोच्या तालावर बैलांची मिरवणूक !!

1011270723
1011270723

जांभोरी : आंबेगाव तालुक्यातील पुणे जिल्ह्याच्या आदिवासी पश्चिम पट्ट्यातील जांभोरी येथे बैलपोळा सण मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. यानिमित्ताने जांभोरी नांदूरकीचीवाडी येथून जांभोरी गावठाणातील व्यंकोजी मंदिर व मारुती मंदिरापर्यंत बैलांची मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशा आणि बँजोच्या तालावर निघालेल्या या मिरवणुकीमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

आदिवासी समाजात बैलपोळा सणाला विशेष महत्त्व असून, शेतीच्या कामात मोलाची साथ देणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. या दिवशी बैलांना सजवून त्यांची पूजा केली जाते तसेच पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. शेती आणि शेतकऱ्यांच्या जीवनाशी घट्ट नाते असलेल्या या सणातून ग्रामीण संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडते.

1011270713

सध्या आदिवासी भागातील शेतकरी दुष्काळाच्या छायेत असतानाही ग्रामस्थांनी आपल्या परंपरेचे जतन करत बैलपोळा सण उत्साहात साजरा केला. बैलांची मिरवणूक, पारंपरिक विधी आणि ग्रामस्थांचा सहभाग यामुळे सणाला विशेष रंगत आली.

यावेळी उपस्थित मान्यवर व ग्रामस्थ : मनोहर चंद्रकांत केंगले गुरुजी, पोलीस पाटील नवनाथ केंगले, सागर काठे, प्रकाश केंगले, दत्ता गिरंगे, हनुमंत केंगले, हनुमंत गिरंगे, रघुनाथ केंगले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुतीदादा केंगले, तुषार गिरंगे, विशाल गिरंगे, रामदास केंगले, हरिभाऊ केंगले, मुरलीधर केंगले, महादू केंगले, आकाश केंगले, लहु गिरंगे, चिंतामण केंगले, दूंदा केंगले, दत्तात्रय केंगले, सुरेश केंगले, दिगंबर केंगले, संदीप केंगले, प्रदीप केंगले, सुभाष केंगले, दिलीप काठे, राजेंद्र उभे, राहुल केंगले यांच्यासह जांभोरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

1011251411
1011250991

Related posts

रील फॉर सॉईल ॲण्ड वॉटर कन्झर्वेशन’ स्पर्धेत सहभाग घ्यावा- चेतन कलशेट्टी ; २१ ऑगस्ट २०२६ पर्यंत जलसंधारण सप्ताह रील्स स्पर्धेचे आयोजन !!

Chief Editor

मोरडेवाडी शाळेचे दोन विद्यार्थी जाणार युरोप, नासा व इस्रोला !!

Chief Editor

धामणीचे सुपुत्र किरण जाधव यांचा नागरी सत्कार ;सैन्यदलातील १७ वर्षांच्या सेवेनंतर मायभूमीत आगमन; ग्रामस्थांकडून ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषात मिरवणूक !!

Chief Editor

Leave a Comment